सोलापूर दक्षिण मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या मतदारसंघातील जनतेला केले आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेनं ठाकरेंना धक्का बसला आहे. प्रणिती शिंदे यांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देत महाआघाडीचा धर्म पाळला असल्याचा दावा केला आहे.






सोलापूर दक्षिण विधानसभामतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. मात्र खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागा वाटपात या मतदारसंघावर केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगत आम्ही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या बाजूने मतदानाचे आवाहन केले असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
उमेदवारीसाठी शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली
सुशीलकुमार शिंदे म्हणाले आम्ही याठिकाणी काडादींना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. या मतदारसंघात चांगलं वातावरण आहे. ते चांगले, शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत. या मतदारसंघातून मानेंना उमेदवारी दिली होती, पण अर्ज मिळाला नाही, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. उमेदवारीसाठी शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली. देवकाते मी दोनवेळा निवडून आलो आहे, हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. एकवेळा त्यांचा उमेदवार निवडून आला आहे.
आघाडी धर्म आम्ही पाळला, आम्ही एबी फाॅर्म दिला नाही
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिला आहे. आघाडी धर्म आम्ही पाळला असून आम्ही एबी फाॅर्म दिलेला नाही. या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून गेलं असेल असं वाटलं, पण आम्ही काडादींच्या मागे आहोत. जो जिता वही सिकंदर होणार असून आम्ही पक्षाकडून एबी फाॅर्म दिला नाही, आघाडी धर्म पाळला आहे.











