रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा मोठा त्रास झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुार, जवळपास 35 ते 40 विद्यार्थ्यांना वायुगळतीमुळे त्रास होत आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय आहे.
Home ताज्या बातम्या रत्नागिरीत वायूगळतीची मोठी दुर्घटना, अनेक विद्यार्थ्यांना त्रास तर रुग्णांना जिल्हा शासकीय आणि...