बच्चू कडूंना मोठा धक्का! शिंदेंनी आमदार फोडला

0

 आता भाजपनं ‘प्रहार’चा बडा नेता गळाला लावला

हायुतीची साथ सोडणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. बच्चू कडू यांचा एकमेव आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोडला आहे. यातच आता भाजपनेही बच्चू कडू यांचा आणखी एक मोहरा गळाला लावला आहे.हा बच्चू कडू यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महायुतीत असलेल्या बच्चू कडू यांनी ‘महाशक्ती परिवर्तन’ आघाडीसोबत घरोबा केला आहे. तेव्हापासून बच्चू कडू हे महायुतीला फैलावर घेत आहेत. यातच ऐन विधानसभेच्या धामधुमीत भाजपनं बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षालाच फोडलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे भाजपत प्रवेश करणार आहेत. थेट प्रदेशाध्यक्षलाच भाजपनं गळाला लावल्यानं बच्चू कडू यांना धक्का मानला जात आहे. अनिल गावंडे यांच्या पक्षप्रवेशावर बच्चू कडू काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिंदेंनी आमदार फोडला…

2019 मध्ये प्रहारचे दोन आमदार निवडून आले होते. त्यात अचलपूर येथून बच्चू कडू आणि मेळघाटमधून राजकुमार पटेल यांचा समावेश होता. बच्चू कडू यांनी सुरूवातील महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले होते. पण, बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडत ‘महाशक्ती परिवर्तन’ आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं थेट बच्चू कडू यांचा आमदार अर्थात राजकुमार पटेल यांना गळाला लावत पक्षात प्रवेश करून घेतला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन