भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; उर्वरित जागा दोन दिवसांत क्लिअर ‘मविआ’चाही आजच निर्णय

0

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (19 ऑक्टोबर) किंवा उद्या सकाळपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपची पहिली यादी केव्हाही येऊ शकते, असे म्हटले होते. यानंतर ते आज सायंकाळी नितीन गडकरींच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. फडणवीस यांनी महायुतीमधील उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचेही म्हणाले होते. सर्व मित्र पक्ष आपापल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करतील.

आमची पहिली यादी कधीही येऊ शकते

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपमधील उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम निर्णय देऊन केंद्रीय मंडळ ठरवते. त्यानंतर या पद्धतीनुसार आमची यादी जाहीर केली जाईल. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कालही आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. निम्म्याहून अधिक जागांचा प्रश्न निकाली निघाला आहे. उर्वरित जागा दोन दिवसांत क्लिअर केल्या जातील. मित्र पक्ष आपल्या सोयीनुसार मोकळ्या झालेल्या जागा जाहीर करतील, असेही आम्ही ठरवले आहे. आमची पहिली यादी कधीही येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महायुतीची चर्चा सकारात्मकपणे सुरू आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सर्व जागांवर 1-2 दिवसात निर्णय घेतला जाईल. आता आमच्यात दुरावा नाही. केवळ 30-35 जागांवर निर्णय होणे बाकी आहे. ते लवकरच होईल. त्या निर्णयावर राज्यात चर्चा झाली नाही तर गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन तोडगा काढला जाईल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लाडकी बहिण योजनेसाठी आम्ही आगाऊ रक्कम दिली आहे. आचारसंहितेच्या समस्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

‘मविआ’च्या 100 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता

दरम्यान, आज (19 ऑक्टोबर) रात्री महाविकास आघाडी  एकत्रित उमेदवार जाहीर करणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर करणार याबाबत निर्णय होणार आहे. जर महाविकास आघाडी म्हणून निर्णय झाला तर उद्या 100 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबतचा निर्णय आज रात्री महाविकास आघाडी घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रावादी काँग्रेस 85 जागांवर लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर चर्चा झाली आहे.