विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त अॅक्टिव्ह झाले असून महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, त्यानंतर रामराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात घेतल्यानंतर आता पुण्यात भाजपला सुरू लावणार आहेत. शरद पवार पुण्यात भाजपला सर्वात मोठा धक्का देणार आहेत. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रात 10 ते 15 माजी आमदार आणि पुणे शहरातील २० नगरसेवकांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेणार आहेत. मुळात पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 7आमदार (शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट भोसरी चिंचवड आणि दौंड) आमदार आहेत. परंतु सध्या प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या संजय काकडे यांनीच बंड केल्यामुळे पुणे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठी खळबळ होणार आहे.






पुणे शहरात ‘किंगमेकर’ अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाल्यानंतरही भारतीय जनता पक्षात मिळालेल्या वागणुकीमुळे हा प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे स्वत: संजय काकडे यांनीच स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार जी जी जबाबदारी देण्यात आली ती यशस्वी करत पक्षासाठी अहोरात्र काम केलं. परंतु पक्षहीत न पाहता फक्त व्यक्तिगत स्वार्थ पाहणाऱ्या लोकांच्या विरोधात दंड थोपटल्यामुळेच प्रशंसा करणाऱ्या चमुकडून संजय काकडे यांना लक्षपूर्वक आखणी करून दुर्लक्षित करण्याचे काम केले. संजय काकडे हे दसऱ्यानंतर ते अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत. मागील काही दिवसांपासून संजय काकडे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरम्यान संजय काकडे हे पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते सुरुवातीला अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेतील भाजपच्या विजयात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. २०१९ आणि २०२४ मध्ये पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नव्हती.
भारतीय जनता पक्षाचा सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडून आलेला एकमेव खासदार(सातारा हा गादीचा खासदार) केंद्रीय मंत्री असतानाही पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते रोज नवीन पक्षात प्रवेश करत असताना माजी खासदार संजय काकडे यांची बंडखोरी भारतीय जनता पक्षासाठी मोठा धोका मानला जात आहे. मुळात पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच वावटळ उग्र होत असताना पश्चिम महाराष्ट्रातील बरेच मराठा समाजाचे नेतृत्व करणारे नेतेच पक्षापासून दुरावत असल्याने पुणे जिल्हा कदाचित 21/0 होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला नगरसेवकांची शंभरी गाठण्यात यशस्वी झालेल्या संजय काकडे यांनी च बंडखोरी पक्का कारल्यामुळे पुणे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघातील गणिते बिघडण्यास सुरुवात होणार आहे.
काय म्हणाले संजय काकडे
पुण्यातील १० आजी-माजी आमदार २० नगरसेवकांबरोबर घेऊन सर्वांना सहकार्य करणाऱ्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती संजय काकडे यांनी साम टीव्हीशी बोलतांना दिली आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देणार असल्याचं ते म्हणालेत.
दहा वर्षे मी पक्षासाठी खूप काम केलं आहे, पक्षाने माझा कुठेही विचार केला नाही. पुणे शहरामध्ये माझ्यासह कार्यकर्त्यांची गळचेपी झाल्याची खदखद काकडे यांनी बोलून दाखवली. दरम्यान, हा भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. समरजितसह घाटगे, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता संजय काकडे भाजपची साथ सोडणार आहेत. गेल्या १० वर्षात पक्षाकडून काहीही मिळालं नाही. भाजपकडून फक्त वापर झाल. फक्त औपचारिक्तेसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय काकडे यांनी दिली.
शंकर पवार यांना पर्वतीतून उमेदवारी मिळावी यासाठी पवारांना भेटलो त्यावेळी पवार म्हटले तुम्हीही पक्षात या. शरद पवारांच्या ऑफर नंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन अंतिम निर्णय झाला.
ज्या पक्षात जाईल पक्ष जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी एकनिष्ठेने पार पाडेल. ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांना फडणवीस यांनी आशीर्वाद दिले तेच आशीर्वाद ते मला देतील अशी खात्री आहे, असा विश्वासही काकडे यांनी वर्तवलाय.











