खडकवासला विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात दोनदा ज्या वारजे माळवाडीत उमेदवारी देण्यात आली त्याभागामध्ये भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून डॅशिंग महिला नेत्या चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टरचा सोहळा रंगणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांचा मेळावा असलेल्या या कार्यक्रमात, प्रसिद्ध कलाकार किरण पाटील हे या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे संचलन करणार आहेत. यावेळी प्रथम विजेत्या महिलेस एक स्कूटर, दुसरे बक्षीस फ्रीज, तिसरे बक्षीस एलईडी टीव्ही, चौथे बक्षीस संगणक सेट आणि पाचवे बक्षीस शिलाई मशीन असणार आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोने लुटण्याची संधी वारजे वारजे मधील आरएमडी कॉलेज येथे भेटणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक सहभागी महिलेस मानाची साडीही देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन दिलीप वेडेपाटील यांनी केले आहे.
दिलीप वेडेपाटील हे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार असून, गेली 2 दशके बावधन भागातून नागरी समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेला दहावी बारावीच्या हजारो यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा असेल की कीर्तन महोत्सव, भिमाशंकर यात्रा असेल की वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेली साधन सामुग्री असो दिलीप वेडेपाटील मतदार संघात सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून काम करताना दिसत आहेत. लोकांना विश्वासात न घेता मनमानी काम करणाऱ्या नेत्यापेक्षा, लोकांच्या गरजांना प्राधान्य देणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठिंबा देण्यासाठी एकत्र या! असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.