भाजपा ‘बालेकिल्ला’ कोथरूडची विधानसभेत ‘हॅट्रिक’च बिकट?; तिहेरी बलस्थानातच बंडखोरीचा ‘एल्गार’

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघ ‘हिंदुत्वाचा बालेकिल्ला’ अशी असलेली ओळख आणि 2009 पासून ३वेळा याच विचाराने मिळवलेला ‘विजय’ 2019 च्या निवडणुकीमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना सुकर वाटला असला तरी यंदा मात्र भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या तीनही ‘शक्तीकेंद्रा’तून सुरू झालेल्या बंडखोरीच्या एल्गार मुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची विजयी ‘हॅट्रिक’ची मनिषा अडखळताना दिसत आहे. मुळात 2019च्या निवडणुकीमध्ये हाती असलेली सत्ता आणि उपभोगत असलेले प्रदेशाध्यक्षापद या दोन गोष्टींच्या जीवावरती 2019 मध्ये सहजरीत्या मित्रपक्ष शिवसेनेची झालेली मदत 2024 च्या निवडणुकीमध्ये प्रमुख विरोधक म्हणून समोर येणार आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराचाच असलेला विरोधक आणि शक्ती केंद्रातील बंडखोरी यामुळे भारतीय जनता पक्षाचे विजयाची घौडदौड कशी शक्य होणार हा खरा चर्चेचा प्रश्न समजला जात आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये 2019 साली विद्यमान मेधा कुलकर्णी या आमदाराचे तिकीट कापून प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात सुरुवातीला मेधा कुलकर्णी यांचा तिकीट कापल्यामुळे त्यांचा समाज नाराज होईल अशी चर्चा सुरू झाली परंतु लक्षणीय बंडखोरी न झाल्यामुळे आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार यांनी मातोश्री आदेशाने आशिष गार्डनच्या पहिल्या मेळाव्यातच उमेदवार विजयी करणार असा संकल्प केल्यामुळे 2019 भारतीय जनता पक्षाला म्हणावा तसा संघर्ष करावा लागला नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना पराभव करण्यासाठी 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांनी लढत तोडीस तोड होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत हा मतदार संघ लढवला. 2019 मध्ये विद्यमान आमदाराचे तिकीट कापूनही केवळ शिवसेनेच्या मदतीवरती या मतदारसंघात निसटता 25000 मतांचा विजय यंदा मात्र अडखळतोय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

त्यातच भरीसभर म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बलस्थान असलेले प्रभाग 13 मधील ज्येष्ठ नेते उज्वल केसकर यांनी सुरू केलेली बंडखोरीची भाषा आणि पाच वर्षे स्थानिक नागरिकांना लोकप्रतिनिधी न भेटणे, केवळ प्रशंसा करणारे चमू (दादांची भेट घडवून देणारे अधिकृत एजंट) च कायम बरोबर या सर्व गोष्टीमुळे प्रभाग 13 मध्ये भारतीय जनता पक्षासाठी कायम मते देणारे नागरिकही सध्या सुरू असलेल्या कार्यपद्धतीमुळे संभ्रमावस्थेत आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाला कायम संजीवनी देण्याचे काम केलेला प्रभाग क्रमांक ९ अन् १३. सन 2009 2014 आणि 2019 सलग 3 वेळा या प्रभागाने भारतीय जनता पक्ष आणि त्याच विचाराला पाठिंबा देत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पक्ष विचाराच्या उमेदवाराचा विजय सूकर केला होता परंतु आता त्याच 9 प्रभागातून प्रबळ दावा करत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची केलेली मागणी आणि वाढता पाठिंबा लक्षात घेता प्रभाग 13मध्ये भारतीय जनता पक्षासाठी अधिकचे कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव मतदार संघामध्ये दिसते.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

पक्षातील बंडखोरी कमी की काय! त्यात मित्रपक्षातूनही बहुजन बांधवांचे ‘नेतृत्व’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रणित पतित पावन संघटनेचा (प्रखर हिंदुत्वासाठी तुरुंगवास भोगलेला) ‘सक्रिय’कार्यकर्ता या या दुहेरी भावनिक मुद्द्याला हात घालत मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘शिलेदारां’ने कोथरूड विधानसभा मतदारसंघ लढण्याची इच्छा जाहीर पत्रकार परिषद घेत व्यक्त केली आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघ वस्ती विभागामध्ये घराघरात संपर्क करण्यासाठी सुरू केला असतानाच याच वस्ती विभागाचा ‘चेहरा’ अजितदादा यांचा खंदा समर्थकच प्रसंगी बंड करावे लागले तरी यंदा निवडणूक लढवायचीच ही भीमगर्जना करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता भारतीय जनता पक्षाचा मुळ बलस्थान असलेले प्रभाग 13 आणि 9 मध्ये आपल्याच विचाराची सुरू असलेली बंडखोरी आणि नव्याने वस्ती विभागाने पुरोगामी विचाराच्या लोकांना आपल्याकडे वळवण्यात मग्न असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी अडसर ठरण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य