मयुर कॉलनी डिव्हायडर उंची कमी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कोथरूड सहायक आयुक्तांना निवेदन

0

गुजरात कॉलनी कडून जाणारा मोकाटे जलतरण तलाव रस्त्यावर मधोमध डिव्हायडर आहे. त्या डिव्हायडरवरची उंची खूपच कमी असल्याने तेथे 4 चाकी वाहनांना आणि इतर मोठ्या वाहनांना देखील तो डिव्हायडर दिसून येत नाही आणि बऱ्याच वेळा वाहने त्या डिव्हायडरवर चढली जातात. अशा प्रकारे बरेचसे अपघात त्या डिव्हायडर मुळे होत असतात. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोथरूड क्षेत्रीय कार्यालय येथे सहायक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही कोथरूड क्षेत्रीय कार्यालय येथे सहायक आयुक्त दुदुसकर साहेब यांची भेट घेतली व त्यांना त्या डिव्हायडर ला पिवळ्या लाईट चे हायलाईटर बसवण्याचे सुचविले तसेच त्याचा आजबाजूला पांढऱ्या आणि पिवळ्या कलरचे पट्टे मारावे जेणेकरून 4 चाकी आणि इतर वाहनांना तेथे डिव्हायडर आहे असे समजून येईल आणि अपघात टळतील. या वेळी दुदुसकर साहेब यांनी या विषयावर त्वरित कारवाही करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी अमोल गायकवाड आणि अमित भगत  उपस्थित होते.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले