राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीच्या चर्चा सुरु असतानाच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज पुण्यात मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. शरद पवार काल मुंबईहून पुण्याला रवाना झाले होते. आज सकाळी सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.






सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली?
सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. या भेटीत त्यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते. शरद पवार, सुप्रिया सुळे मोदी बागेतील निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामुळं सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सुनेत्रा पवार शरद पवार सुप्रिया सुळे यांना भेटल्या का याबात उत्सुकता देखील निर्माण झालेली आहे.











