जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

0

नाशिक ( प्रतिनिधी ) :  महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन अंतर्गत नाशिक डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे नाशिक जिल्हा योगासन निवड चाचणी तथा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २८ जुलै २०२४ रोजी, वय १० ते ५५ वर्षापर्यंत सर्व वयोगटात ही स्पर्धा विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे.

या स्पर्ध्रेतून निवडलेला संघ १६ ते १८ ऑगस्ट रोजी संगमनेर येथे होणाऱ्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी पाठवला जाईल. योगासनांचा आशियाई स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित झाला असल्यामुळे योगासनपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची मोठी संधी आहे. या जिल्हा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धक योगासनपटूंनी सहभाग लवकरात लवकर नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

स्पर्धा नियम, वयोगट, अभ्यासक्रम, प्रवेशाची लिंक याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव प्रा. पिराजी नरवाडे (मो. ९४२२२ ४७२०९), उपाध्यक्ष दिपक उपासनी (मो. ९०२१६ ७०४५७), कोषाध्यक्ष मंदार भागवत (मो. ७७२०० ५२५२७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिक डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स अससोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

🌿