मुख्यमंत्र्यांवर समाधानी नसून ते गुळगुळीत उत्तर देतात: हाके

0
4

जालना : राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी लक्ष्मण हाकेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाने सरकारचंही लक्ष वेधून घेतलं आहे. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. आता सरकारचं शिष्टमंडळ उद्या शुक्रवारी लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या सरकारच्या शिष्टमंडळावर हाके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारच्या शिष्टमंडळावर भाष्य करताना हाके म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या शिष्टमंडळ पाठवणार असल्याचे सांगितले. आम्ही दोनच प्रश्न विचारले, शिष्टमंडळ कशासाठी पाठवतात? मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर समाधानी नसून ते ठोस काही बोलत नाही. गुळगुळीत उत्तर देतात. मी शिष्टमंडळाशी बोलणार सुद्धा नाही, त्यांनी त्यांची भूमिका मांडायची अन् निघून जायचं’.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी जरांगेंनी सभा घेतल्या, असा आरोप करत हाके पुढे म्हणाले, ‘सर्व माध्यमांना माहिती आहे. त्यांचे दौरे माहिती आहे. ते आमच्या माढ्याकडे आले होते. त्यांचं शेड्युल आलं होतं. तुम्हाला शेड्युल देईल, त्यांनी कुठे कुठे बैठका घेतल्या’.

‘जातीय विद्वेष पेरला गेला. त्याचा परिणाम किती झाला मला माहीत नाही. ते प्रभावी पॅसिफिक नेतृत्व नाही. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये विष पेरण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी बैठका घेतल्या. चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, पंकजा मुंडे, महादेव जानकर कसे पराभूत होतील? बैठकांचं सोडा, त्यांचं जाहीर विधान आहे की, पराभव करा. पुढील पाच पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजे, असं त्यांचं विधान आहे, असे हाके म्हणाले.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

विजय वडेट्टीवार यांना भेटल्यानंतर अश्रू अनावर झाले, यावर बोलताना हाके म्हणाले, ‘ही समूहाची भावना आहे. त्यावेळी त्यावेळेस भावना अनावर होते. मी मागासवर्गीय आयोगाचा सदस्य होण्याआधी अनेक बैठका आणि सभा घेतल्या. लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं आहे’.