भारतीय साहित्याच्या क्षेत्रात अत्यंत सन्मानाचे समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या बालसाहित्य आणि युवा पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कांदबरीची बालसाहित्य पुरस्कारासाठी तर तर युवा पुरस्कारासाठी देविदास सौदागर यांच्या ‘उसवण’ ची निवड करण्यात आली आहे.






साहित्य अकादमीचे हे पुरस्कार अकादमीचे अध्यख माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळांच्या २३ सदस्यांच्या संमतीनंतर हे पुरस्कार जाहीर करण्यता आले आहेत. यात मराठीसह नेपाळी आदी २४ भाषेतील बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर युवा पुरस्कारात संस्कृत भाषेतील पुरस्कार हा नंतर जाहीर केला जाणार असल्याचे अकादमीकडून सांगण्यात आले.











