प्रभाग 10 मधील नाल्यांची समाधानकारक साफसफाई करा; दिलीप वेडेपाटील यांची मागणी

0

मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी इतर सहकारी नगरसेवकांसह प्रभाग क्र.10 मधील कोथरूड परिसरातील मोकाटे नगर – कोथरूड डेपो, सागर कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शास्त्री नगर,लक्ष्मीकांत कॉलनी, भारती नगर, पूजा पार्क सोसायटी शेजारी,गादीया इस्टेट व आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मुख्य रस्त्यालगतच्या नाल्यांची साफसफाई झाली असली तरी पाण्या ठिकाणी अजूनही साफसफाई बाकी असून या भागातील साफसफाई अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी पाण्यामध्ये निदर्शनास आले.

अनेक ठिकाणी प्रशासनाने व्यवस्थित काम केले असल्याचे यावेळी निदर्शनास आले तर काही ठिकाणी अत्यंत अडचणीत असणारे नाले साफसफाई करणे अत्यावश्यक असल्याने आज अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

या पाहणी दरम्यान मा. सदानंद लिटके – उपअभियंता ड्रेनेज विभाग पुणे मनपा , मा.अजिंक्य वानखेडे – कनिष्ट अभियंता, मा. पुनीत जोशी, नगरसेवक – दिलीप वेडेपाटील, नगरसेविका – अल्पना वरपे आदी मान्यवर उपस्थित होते.