All Eyes On Rafah ला कोट्यवधी लोकांचं समर्थन, कोणी केली होती सुरूवात ?

0

All Eyes On Rafah ही सोशल मीडियावरील अशी स्टोरी आहे जी आत्तापर्यंत बहुतांशी युजर्सनी पाहिली असेल. जगातील नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये ठेवली. जगभरात सुमारे 5 कोटींहून अधिकवेळा ही स्टोरी शेअर करण्यात आली. इस्रायलच्या रफाहवरील एअर स्ट्राइकमध्ये 45 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. AI जनरेटेड ‘ऑल आइज ऑन रफाह’ च्या पोस्टमधून इस्रायलच्या अमानवीय कृत्याकडे जगाच लक्ष वेधलं जातंय. मोठ्या प्रमाणात ही पोस्ट शेअर करण्यात आली. या फोटोमध्ये नेमक काय होत की ती इतके वेळा शेअर झाली?. ही पोस्ट नेमकी कोणी बनवली आणि त्या मागाचा नेमका हेतू काय ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सोशल मीडियावर शेअर झालेल्या या पोस्टमध्ये काही तंबू दिसत होते, त्यावर मोठ्या अक्षरात All Eyes On Rafah असं लिहीण्यात आलं. हा फोटो मलेशियाच्या एका इन्स्टा यूजरने, shahv4012 याने AIच्या सहाय्याने बनवला होता. इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केल्यानंतर मंगळवारी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. मात्र तो फोटो शेअर झाला आणि त्या ट्रेंडने बघताबघता असा वेग पकडला की मलेशियातून तो जगभरात पसरला. त्याला काऊंटर करण्यासाठी , विरोध करण्यासाठी इस्रायलच्या समर्थकांनीही अनेक ट्रेंड चालवण्याचा प्रयत्न केला.

इतका शेअर का होतोय हा फोटो ?

गाझामध्ये होत असलेल्या घटनांकडे लक्ष वेधून घेणं एवढाच या ट्रेंडचा अर्थ नाही. जसजसे जास्तीत जास्त लोकं ही पोस्ट शेअर करतील तसे लोकांचे लक्ष वेधले जाईल आणि राफाहमध्ये काय होतंय याचा विचार लोक करू लागतील. सोशल मीडियाच्या या युगात पाश्चात्य मीडियाच्या अजेंड्याला विरोध करण्यासाठी असे ट्रेंड प्रभावी ठरतील, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

कोण आहे यूजर shahv4012?

यूजर shahv4012 याच्याबद्दल सध्या खूप माहिती उपलब्ध नाही, पण त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरीन मिळालेल्या माहितीनुसार, तो मलेशियन नागरिक असून त्याला फोटोग्राफीची आवड आहे.

इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला. त्यात अनेक निष्पाप, निपराध नागरिक लहान मुलं, महिला यांना आपले प्राण गमवावे लागले. हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणं हा या स्ट्राइकमागे उद्देश असल्याच इस्रायलकडून सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात निष्पाप जीव मारले गेले. म्हणून ‘ऑल आइज ऑन रफाह’ नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे.