पिण्याचं पाणी परिस्थिती बिकट; 15 दिवसांने पाणी पुरवठा सोलापूर, नगर जिल्हा लाखो लोकांची मदार फक्तं टँकर्सवरच

0

गतवर्षी झालेल्या कमी पावसाच्या प्रमाणामुळे दुष्काळाचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. महाराष्ट्रातील नगर आणि सोलापूर जिल्ह्याला याचा सर्वात मोठा फटका बसल्याचे पाहण्यास मिळत असून सोलापूर शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा तर अक्कलकोटमध्ये तर तब्बल पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी फक्त आणि फक्त टँकरवरच मदार निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 291 गावांत आणि 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नगरमध्ये सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत असताना सोलापूर जिल्हा मात्र तहानलेलाच आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

जिल्ह्यात सध्या नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून सहा – सहा दिवस पाणी येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात 312 टँकर सुरु करण्यात आले आहेत. नगरमध्ये सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. मात्र, पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील पाच-पाच दिवस येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 291 गावांत आणि 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून निवडणुकीत व्यस्त असलेल्या प्रशासनाने आता पाणी पुरवठ्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. पाण्याची टंचाई एवढी जाणवत आहे की, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील नागरिकांनी पाण्यासाठी थेट तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. दरम्यान प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतले.

जिल्ह्यात पाण्याचे किती टँकर्स
संगमनेर – 27 अकोले – 5 कोपरगाव – 3 नेवासा – 3 नगर – 29 पारनेर – 34 पाथर्डी – 99 शेवगाव – 11 कर्जत – 42 जामखेड – 23 श्रीगोंदा- 9 टँकर

सोलापूरातील सीना नदी पुर्ण कोरडी झाली

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत असताना सोलापूर जिल्हा मात्र तहानलेला आहे. पाण्याच्या संकटामुळे सोलापूर शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा तर अक्कलकोटमध्ये तब्बल पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. मोहोळ तालुक्यातील सीना नदीचे पात्र पूर्णपणे कोरडं झालंय.

राज्यातील धरण आणि तलावांचा पाणीसाठा आटतोय
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उन्हाचा कडाका वाढल्याने विविध भागांमधील पाणीसाठा वेगाने आटत आहे. अनेक धरणांमधील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. पुढील काही दिवस पुरेल, इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे आता सर्वांना मान्सूनचे वेध लागले आहेत. मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होईल.