शेवटच्या टप्प्यात शिरूर पुणे थेट लढतीची रंगत; पारंपारिक प्रतिस्पर्धी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जाहीर सभांचा धडाका

0

राज्यात 3 टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. राज्यात आता चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सभांचं मॅरेथॉन रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांची थेट लढत असून प्रचाराचा बदलता रंग लक्षात घेऊन काँग्रेसने या निवडणुकीमध्ये जोर लावण्यास सुरुवात केली आहे तर शिरूर मध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्येच थेट लढत असल्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फेरीमध्ये प्रचारांनी जोर पकडला आहे. आज सुप्रिया सुळे यांच्या पेठ आणि घोडेगाव येथे सभा पार पडणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीकडून सभांचा धडाखा पाहायला मिळत आहे. तर अजित पवार यांच्या शिरुरमधील केंदुर, शिरुर शहर, आणि न्हावरा या ठिकाणी सभा पार पडणार आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज पुण्यात दोन सभा पार पडणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात फडणवीस यांच्या जाहीर सभा होत आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाणेर परिसरात सभा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 8 वाजता पर्वती परिसरात सभा पार पडणार आहे.

बारामतीनंतर आता शिरुर लोकसभा मतदार संघात मॅरेथॉन सभा धडका लागला आहे. आज सुप्रिया सुळे दोन तर अजित पवार तीन सभा घेणार आहे. शिरुरमधुन अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे. परंतु, प्रतिष्ठा मात्र दोन्ही पवारांची पणाला लागली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मागच्या वेळी अजित पवारांनी कोल्हेंना सोबत घेऊन आढळराव पाटलांचा पराभव केला होता. यावेळी लढत तिच असली तरी राजकीय फासे मात्र उलटे पडले आहेत. यावेळी कोल्हेंचा पराभव अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यामुळे शिरुरमध्ये शरद पवारांनीही अमोल कोल्हेंच्या पाठीशी तगडी ताकद उभी केली आहे. यासाठी दोन्हीही बाजुने सभांचा धडका लागला आहे. दोन्ही बाजुने एकमेकांवर आरोपही केले जातात. आज सुप्रिया सुळे कोल्हेंसाठी शिरुरच्या मैदानात येत आहे.