लोकसभा मतदान केंद्रावर राडा!; ‘न्याय नाही तर, मतही नाही’ची घोषणाबाजी गोळीबार अन् EVMची तोडफोड

0

लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (19 एप्रिल) मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यातील थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाला. यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. यादरम्यानच, इंफाळ पूर्व येथील थोंगजू येथील एका बूथवर ईव्हीएम तोडफोडीची घटनाही घडली. मात्र हा हल्ला कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राज्यातील इनर मणिपूर आणि आउटर मणिपूर या दोन जागांवर आज मतदान होत आहे. 26 एप्रिल रोजी आउटर मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातील काही बूथवरही मतदान होणार आहे. या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या वर्षभरापासून (3 मे 2023) कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

‘न्याय नाही तर, मतही नाही’, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा

कुकी संघटनांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. ‘न्याय नाही तर, मतही नाही’ अशी घोषणाबाजी त्यांनी यावेळी केली. अशात आज (19 मार्च) येथे ही भयावह घटना घडली. मात्र हा हल्ला कोणी केला हे अद्याप समजलेलं नाही आहे.  यानंतर लोकांमध्ये गोंधळ उडाला असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबारात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मतदानावेळी झालेल्या गोळीबारानंतर इंफाळची परिस्थिती काय?

इंफाळमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत मैतेई ग्रूपच्या आरामबाई टंगोलने हट्टा मतदान केंद्र ताब्यात घेतले. याशिवाय, कमी मतदानामुळे कांगपोकपी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रे सुनसान दिसत आहेत. मात्र, कुकीबहुल असलेल्या चारचनपूर जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले आहे. या धक्कादायक घटनेनंतर मणिपूरमध्ये आजही हिंसाचार सुरू असल्याचं दिसतं. गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत येथे हिंसाचाराच्या घटनांमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाले आहेत. तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 65 हजारांहून अधिक लोकांनी आपली घरंही सोडली आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा