यंदाची लोकसभा ही एक अनोखी आणि आगळी वेगळी आहे नवनवीन तंत्रज्ञान आणि क्लुप्त्या लढवत सर्वजण या लोकशाहीच्या रणांगण उतरलेला असताना या नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे राज्यातील सर्व डिजिटल पत्रकारांनाही अवलोकन व्हावी यासाठी संस्थापक अध्यक्ष राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्यावतीने एक अनोखा एकीकरण आयोजित करण्यात आले असून प्रत्यक्ष आणि थेट बातमीशी संपर्क असलेल्या या डिजिटल मध्ये माझ्या प्रतिनिधींना या नव्या तंत्रज्ञानाचा आणि कायद्यांचा त्यासह संधींचा उपयोग कसा करून घ्यायचा याची माहिती करून देण्यासाठी वैचारिक पुणे शहरांमध्ये हे on spot पत्रकार यांच्यासाठी एक नवी पर्वणी घेऊन आलेले आहेत.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये काहीतरी समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपलं सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत रात्रंदिवस कष्ट करून पत्रकारिता करणार्या या नव्या घटकाला ताकद देण्याच्या उद्देशाने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ही संघटना काम करत असून ज्या मनामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान अंकुरले आहे त्याचे संरक्षण करण्याच्या उदात्तेतूने संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी या संघटनेची स्थापना केली आणि या अंकुरलेल्या सामाजिक भावनेला संरक्षण देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवत दिशा देण्याचे काम केलं आहे. राज्यात सुमारे 9000 नोंदणीकृत पत्रकार असून त्यांच्या विचारांना एक दिशा देण्यासाठी आणि संघटन करून दुसरे महाअधिवेशन कणेरी मठ कोल्हापूर येथे नुकतेच पार पडले. यादरम्यान चर्चा झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) या विषयावरती चर्चा करण्यात आली परंतु हे तंत्रज्ञान प्रचंड लाभदायी आणि उपयोगाचे आहे याची विभागवार सर्व पत्रकारांना माहिती मिळावी या उदात्त हेतूने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणे विभागाच्या वतीने २३/०३/२०२४ रोजी सकाळी १० ते ३ हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन, सणस ग्राऊंड शेजारी स्वारगेट पुणे येथे एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये मा. मनोज पाटील (अतिरिक्त आयुक्त पुणे शहर पोलीस), माध्यम तज्ञ मा. चंद्रकांत भुजबळ व मा. अतुल पाटील यांचे माध्यमांसाठी आचारसंहिता आणि कायदे या विषयावरती सखोल विश्लेषण करणार आहेत. संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर हे डिजिटल माध्यमांचे बदलते स्वरूप या विषयाअंतर्गत डिजिटल मीडिया या क्षेत्रात काम करताना तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा आणि कोणती काळजी घ्यायची या विषयावरती सखोल विश्लेषण करणार आहे तर नव्या आव्हानांना सामोरे जाताना संगणकाचा या डिजिटल माध्यमातून कसा फायदा होत आहे आणि यातून नक्की काय साध्य करता येईल या विषयावरती ही विश्लेषण करणार आहेत. उच्च शिक्षण प्राप्त असतानाही सामाजिक जाणिवेचे भान म्हणून पत्रकारिता क्षेत्रात गेली तीस वर्षे काम करणारे मा. नंदकुमार सुतार (संपादक) हे बदलत्या तंत्रज्ञानानुसार परदेशात दैनंदिन वापरले जाणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान डिजिटल माध्यमांसाठी कशी वरदायीनी आहे हे डिजिटल पन्नकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर या विषयाने विस्तृत विश्लेषण करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून *मा. राजा माने* सर आपल्या अनुभवाच्या जोरावर बदलत्या आव्हानांना कसे सामोरे जायचे यावरती मार्गदर्शन करणार आहेत.
माऊली म्हेत्रे : राज्य संघटक, महेश टेळे पाटील : अध्यक्ष पुणे शहर, विकास शिंदे : अध्यक्ष पिंपरी चिंचवड, अजिंक्य स्वामी : पुणे जिल्हा अध्यक्ष, हर्षद कोठावडे कार्याध्यक्ष पुणे शहर, धनराज माने: कार्याध्यक्ष पुणे शहर, केतन महामुनी : सहसचिव, शामल खैरनार : राज्य समन्वयक, सतीश सावंत उपाध्यक्ष, सल्लागार अरुण खोरे, नितीन पाटील, विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, महेश कुगांवकर : सचिव, राज्य संघटक : शरद लोणकर, अमोल पाटील, तेजस राऊत, किशोर मरकड, मोहन राठोड, यांच्या संयुक्त प्रयत्नातून डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.