डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार भगवान साळवी यांना जाहीर

0

अधिराज्य: आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, समाजसेवक, रिपब्लिकन सेना (दक्षिण मुंबई) अध्यक्ष, सम्यक कोकण कला संस्था (रजि.) या संस्थेचे कार्याध्यक्ष, फळसप बौद्धजन सेवा संघ ता. म्हसळा, जिल्हा रायगड या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भगवानजी साळवी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार – २०२३-२४ जाहीर झाला असून मंगळवार दि. १२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या भगवान साळवी यांना सामाजिक कार्याची ओढ लहानपणापासून होती त्यातूनच समाजकारण व राजकारणात कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी काम त्यांनी सुरू केले त्याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना सदर पुरस्कार प्रदान होत आहे त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा