सिंहगडच्या दरीत अडकलेल्या गिर्यारोहकाची ३तासांनी सुटका

0

किल्ले सिंहगडावर पर्यटकांप्रमाणे गिर्यारोहकांचीही शनिवारी-रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे. महाशिवरात्रीला सुट्टी असल्याने गिर्यारोहन करण्यासाठी आलेला एक जण सिंहगडावरील तानाजी कड्याजवळ तीन तास अडकून पडला होत. स्थानिक युवक आणि सुरक्षारक्षकांनी दोरखंडांच्या साह्याने त्याला वर घेत सुखरूप सुटका केली.

सिंहगडाच्या परिसरातील शिवकालीन महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी शुभम माने (वय २८ चिखली, रा. पिंपरी चिंचवड) हा सकाळी एकटाच निघाला. अतकरवाडी मार्गावरुन तो सिंहगडावर आला. गडाच्या माथ्यावरील उदयभान समाधी जवळील मार्गाने तो कोळवडी ( ता. वेल्हे) जवळील उंच डोंगरावरील मेंगजाई हगड रस्ता – किल्ले सिंहगडावर पर्यटकांप्रमाणे गिर्यारोहकांचीही शनिवारी-रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे. महाशिवरात्रीला सुट्टी असल्याने गिर्यारोहन करण्यासाठी आलेला एक जण सिंहगडावरील तानाजी कड्याजवळ तीन तास अडकून पडला होत. मंदिराच्या बाजूला निघाला. मात्र, उंच डोंगरावरील मंदिर दूर अंतरावर असल्याने तो अर्धा रस्त्यावरुन माघारी निघाला. गडाच्या पायथ्याहून जुन्या मार्गाने शुभम याने सकाळी साडे दहाच्या सुमारास चढाई सुरू केली.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

तो तानाजी कड्यालगत असलेल्या तटाखाली अडकून पडला त्याला पुढेही जाता येईना आणि खाली माघारीही उतरता येईना. दुर्गम ठिकाणी खोल कड्यात तो अडकला होता. त्याने मदतीसाठी जोरात आवाज देण्यास सुरूवात केली, त्याचा आवाज ऐकून स्थानिक युवक महेश सांबरे, सचिन पढेर, रोहित जोरकर, सचिन भोंडेकर, समीर रांजणे, दत्तात्रय जोरकर, नंदु जोरकर यांनी कड्याच्या माथ्यावर धाव घेतली.दोरखंडाच्या साह्याने युवकांनी १०० फूट दरीतून शुभम याला बाहेर काढले. त्याच्या हातापायाला खरचटल्याने जखमा झाल्या होत्या. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील, संदीप कोळी, वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर यांनी मदतकार्य करणाऱ्या युवकांचे आभार मानले.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

मंदिराची वाट चुकली…

शुभम हा निष्णांत गिर्यारोहक आहे. महादेवाचे मंदिर समजून तो राजगड मार्गावरील मेंगजाई मंदिराकडे निघाला होता. मात्र, मंदिर दूर असल्याने तो पुन्हा गेलेल्या मार्गाने गडावर चढाई करत होता. त्यानंतर भरकटत दुर्गम कड्यात गेला.