अजित पवारांची माणिक दुधाणे यांच्या निवेदनावर घोषणा; मिळकतकरावरील शास्ती कर रद्द करणारं…

0

सध्या संपूर्ण पुणे शहराला भेडसवणारा एक प्रश्न म्हणजे मिळकत करावर आकारण्यात येणारा शास्ती कर… गेल्या काही दिवसापासून आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांकडून याविषयी सातत्याने मला तक्रारी प्राप्त होत होत्या.. त्यावर विचार केला असता माझे असे लक्षात आले की 3 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून पिंपरी चिंचवड शहराची मिळकत कराची शास्ती माफ केलेली आहे.. त्याच धर्तीवर पुणे शहराचीही शास्ती रद्द करता येऊ शकते. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माणिकशेठ दुधाने यांनी आज अजित पवार यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष मा. दीपकभाऊ मानकर यांनी भेटून याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खडकवासला मतदारसंघाचे आमदार मा. भीमराव अण्णा तापकीर, कोथरुड मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील, शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार मा. सिद्धार्थ शिरोळे यांनी त्याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन सदरचा शास्ती कराचा प्रश्न शासनस्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न केला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अखेर आज मा. अजितदादा पवार साहेब व मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची वारजे येथील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात भेट झाली. तेव्हा त्यांना सदरच्या विषयाचे निवेदन देऊन यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन नागरिकांची या आर्थिक समस्येतून सुटका करण्याची विनंती केली असता आदरणीय अजितदादांनी क्षणातच याची दखल घेऊन लगेच याच कार्यक्रमात निर्णय दिला, की लोकसभा निवडणुकीच्या आधी अथवा निवडणूक झाल्यावर लगेचच याचे परिपत्रक काढणार असल्याचे सांगितले.