काही दिवसांपूर्वी मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्या राजकीय हालचालींना वेग आला होता. सुप्रिम कोर्टाकडून स्थगिती मिळाल्यानंतर राहुल गांधीच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला होता. त्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले होते की ‘जो लडेगा,वो जितेगा’. यावर केंद्रीय मंत्री आश्विनी कुमार चौबे यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मागासवर्गाचा अपमान केलाय आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल, असे मत चौबे यांनी व्यक्त केले.
राहुल गांधी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यावर कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आनंद साजरा करण्यात आला होता. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की,”हा राहुल गांधींचा नाही तर, जनतेचा विजय आहे, संविधानाचा विजय आहे.” राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री आश्विनी कुमार चौबे यांनी आपले मत व्यक्त केले.
एएनआयशी बोलताना ते म्हणाले की,”सुप्रिम कोर्टाचा निर्णय आला, तर तुम्ही मोठा तीर मारलाय का? सुप्रिम कोर्टाने फक्त स्टे लावलाय, तुम्ही निर्दोष आहात, असं सुप्रिम कोर्टाने नाही म्हटलंय.
खालच्या कोर्टाने तुम्हाला शिक्षा सुनावली, आता वरचं कोर्ट ठरवेल की शिक्षा कमी करायची की वाढवायची. अतिमागास समाजाला शिवी दिली आणि आता लाडू खाताय.तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही पुर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे. अति मागास समाजासोबत असं हास्यास्पद कॉंग्रेसशिवाय दुसरं कोणी करु शकतं नाही.
यापुढे चौबे म्हणाले की,”कॉंग्रेचा हा जो युवराज आहे, तो गरीब अतिमागास मोदींना शिव्या देतोय. याला जनता माफ करणार नाही आणि कोर्ट देखील तुम्हाला आज न उद्या शिक्षा देणारचं आहे. अति मागास समाजाला जी तुम्ही शिवी दिली होती , याची शिक्षा तुम्हाला व्याजासकटं मिळणार.