कोर्टरुममध्येच न्यायमूर्तींनी दिला राजीनामा; नागपूर खंडपीठामध्ये धक्कादायक घटना

0

नागपूरः नागपूर खंडपीठामध्ये आज एक आश्चर्यकारक घटना घडली. भर कोर्टरुममध्ये न्यायमूर्तींनी राजीनामा दिला. बदलीमुळे व्यथित होत रोहित देव यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.

नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव हे आज कोर्टरुममध्ये दाखल झाले. त्यानंतर उपस्थितांना बोलतांना त्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त केली. मी राजीनामा देत आहे, माझ्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला.

न्यायमूर्ती रोहित देव हे दीड ते दोन वर्षांनंतर निवृत्त होणार होते, असं सांगितलं जात आहे. परंतु त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला. बदलीमुळे व्यथित होत राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. मात्र राजीनाम्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

५ जून २०१७ रोजी न्यायमूर्ती रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. दोन वर्षे सेवा बजावल्यनंतर देव यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती होते. आज अचानक त्यांनी राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं.