अजित पवारांचीच ‘ दादागिरी’; राष्ट्रवादीचे ‘इतके’ आमदार सोबत: कायमच अन्याय नवा सुर उमटला

0

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल सुरू झाली आहे. तर पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्या पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. आज अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार किती हे स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 29 इतकी आहे. तर आमच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत, असं अनिल पाटील यांनी म्हंटलं होतं. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95 टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे असं काही नेत्यांनी म्हंटलं होतं.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

त्याचबरोबर आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. अजित पवार यांनी रविवारी समर्थक आमदारांना घेऊन शिवसेना- भाजप सोबत युतीत सहभाग घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी उलाढाल झाली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी एकूण 29 आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.

अजित पवार यांना पाठींबा देणाऱ्या आमदारांची नावे

अदिती तटकरे.       निलेश लंके.      सुनील शेळके

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

धर्मराव आत्राम.        हसन मुश्रीफ. धनंजय मुंडे

अजित पवार.       दिलीप वळसे पाटील.   छगन भुजबळ

अनिल पाटील.         नरहरी झिरवळ.        संजय बनसोडे

राजू कारमोरे.     अण्णा बनसोडे.          सुनील टिंगरे

माणिकराव कोकाटे.       यशवंत माने.   इंद्रनील नाईल

बाळासाहेब आकबे.   राजेश पाटील.      शेखर निकम

नितीन पवार.             दत्ता भरणे.      संग्राम जगताप

मनोहर चंद्रिकापुरे.    दिलीप मोहिते.    सरोज आहिर

प्रकाश सोळंखे.        अतुल बेनके

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा