जाणीवपूर्वक जातींमध्ये तेढ राज्यात मोठं षडयंत्र सुरुय! अजित पवारांना अशी शंका का येतेय?

0

आपला देश आणि महाराष्ट्र सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे”, असं राष्ट्रवादी नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराचे उद्घाटन आज अजित पवार यांनी केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आहेत की, ”सध्या राज्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. एकविसाव्या शतकातही मुंबईत अशी घटना घडली आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात केंद्राने राज्याने कायद्यात बदल करुन त्या व्यक्तीला तशाच प्रकारे शिक्षा दिली पाहिजे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ”आमच्या सरकारच्या काळात कुठे जातीय दंगल झाली का? मात्र आता स्वतः ची राजकीय पोळी भाजण्यासाठी दंगली सुरू आहेत. काही वर्ग जाणीवपूर्वक जातींमध्ये तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजता येईल का, यासाठी असा प्रकार सुरू आहे.”

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

‘पवारांना धमकी देणारा हा भाजपचा पदाधिकारी’

अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात दंगली घडत आहेत. या सर्वांचा मास्टरमाईंड कोण आहे? हे शोधल गेल पाहिजे. ते म्हणाले, ”पावरांना तसेच इतर मान्यवरांना सोशल मीडियावर धमकी देण्यात येते. धमकी देणारा हा भाजपचा पदाधिकारी आहे. अशा धमकी देणाऱ्यांवर वेळीच पकडल्या गेल पाहिजे. पवारांचे संरक्षण करण्यास राज्याची जनता समर्थ आहे.

‘शिंदे यांना ७४ टक्के लोकांची पसंती नाही’

शिवसेना आणि भाजप जाहिरात वादावर अजित पवार म्हणाले की, ”जाहिरातीत २६ टक्के लोकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली. याचा अर्थ ७४ टक्के लोकांची पसंती तुम्हाला (एकनाथ शिंदे यांना) नाही.” ते म्हणाले, ”तुमचं सरकार इतक कर्तबगार असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती