तेलंगणात हमीभावामुळं कांद्याला दुप्पट भाव, उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर : नागेश गोडाम

0

सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणामध्ये चांगला दर मिळत आहे. तेलंगणा सरकारच्या हमीभाव योजनेमुळे महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर मिळत असल्याची प्रतिक्रिया तेलंगणाचे माजी आदीवासी मंत्री नागेश गोडाम यांनी दिली.

तेलंगणा येथे महाराष्ट्रातील कांद्याला दुप्पट भाव दिला जात आहे. जो कांदा भाव नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ महाराष्ट्रात आली, त्या कांद्याला तेलंगणा सरकार चांगला दर देत आहे. तेलंगणा सरकारच्या हमीभाव कायद्यामुळं हा भाव देऊ शकले असेही नागेश गोडाम म्हणाले. गोडाम हे वर्धा इथं आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात 288 जागांवर लढणार निवडणूक लढणार

वर्ध्यातील कारंजा घाडगे येथे भारत राष्ट्र समितीने शेतकरी परिषदेचं आयोजन केलं होते. यावेळी नागेश गोडाम बोलत होते. कारंजा घाडगे येथे भारत राष्ट्र समितीकडून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले. तेलंगणा सरकारमध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्याच्या शेतमालाला भाव मिळण्यासाठी हमीभाव तर आहेच याशिवाय एक विशेष निधी देखील आहे. ज्यामुळे शेतकऱ्याला भाव देणे शक्य असल्याचे नागेश गोडाम यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभेच्या 288 जागांवर भारत राष्ट्र समिती लढणार असून कुणाशी युती केली जाणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा संकटात

कष्टाने पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला गेल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी विविध ठिकाणी आंदोलने देखील करत आहेत. दरम्यान, अशा स्थितीत तेलंगणा सरकारनं कांद्याला चांगला दर दिल्यानं राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सर्व राज्यांमध्ये कांद्याची पेरणी केली जाते. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशचा 16 टक्के वाटा आहे. कर्नाटक आणि गुजरातचा वाटा सुमारे 9 टक्के आहे. खरीप हंगाम, खरीप हंगाम सरताना आणि रब्बी हंगामात असे वर्षातून तीन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते. देशभरातील कांद्याच्या काढणीच्या वेळेमुळे वर्षभर ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होतो. परंतु काहीवेळा हवामानाच्या अनियमिततेमुळे एकतर साठवलेला कांदा खराब होतो किंवा पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान होते. ज्यामुळे पुरवठ्यात अडथळे येतात आणि देशांतर्गत किमती वाढतात.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. याचा सर्वाधिक मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका कांद्यासह इतर पिकांना बसला होता. फळबागांचेही मोठे नुकसान झाले होते. या फटक्यातून शेतकरी सावरत असतानाच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.