आसिफ मुरसल, प्रतिनिधीसांगली, 1 जून : सांगली मध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने धामणी रोडवरील ऐश्वर्या मंगल कार्यालय मधील भिंत कोसळली आहे.या अपघातामध्ये एका वाढप्याचा मृत्यू झाला आहेस तर सहा वाढपी जखमी झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धामणी रोडवरील ऐश्वर्या मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभ होता.लग्न झाल्यावर वाढप्याचं काम आवरून जात असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कर्मचारी जेवणाच्या हॉल मध्ये थांबले होते, त्याच वेळी चिराच्या विटांची भिंत खाली कोसळली. या मध्ये उमळवाड (ता. शिरोळ कोल्हापूर ) येथील युवक ठार झाला आहे, तर सहाजण जखमी आहेत.aआदित्य कपूर कोळी असे मृत युवकाचे नाव आहे. आदित्य तसेच जखमी असणारे सर्वजण एका केटरर्सकडे काम करतात. आज गुरुवारी ते त्याच कामासाठी इनाम धामणी येथे आले होते.काम संपल्यानंतर ते परत जात असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
त्यावेळी ते पावसापासून बचाव करण्यासाठी धामनीतील मंगल कार्यालयाजवळ असलेल्या भिंतीच्या आडोशाला थांबले होते. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने ती भिंत कोसळली आणि ते भिंतीखाली सापडले. संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी ग्रामस्थ आणि अन्य लोकांनी त्यांना तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.तेथे आदित्यचा मृत्य झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच आदित्यच्या नातेवाईकांनी सिव्हिल रुग्णालयामध्ये धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला, त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.











