“पुणे तिथे काय उणे” राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक वारसा जपणाऱ्या पुणे शहरातील शिक्षण विभागाच्या मराठी, इंग्रजी व उर्दू या तिन्ही माध्यमातून एकूण २८५ शाळांमधून लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया घडवण्याचे महान कार्य करणाऱ्या बालवाडी शिक्षिका व सेविका तसेच कायम व रोजंदारी मध्ये काम करणारे शिपाई, रखवालदार यांच्या दर महाचे वेतन मिळवण्यासाठी गेली दोनवर्षे झाली सातत्याने झगडावे लागत आहे.






महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात बालवाडी शिक्षिका, सेविका, रखवालदार व शिपाई असे एकूण १८७७ कर्मचारी काम करत आहेत. शिक्षण मंडळ हे महानगरपालिके मध्ये विलीन झाल्यापासून दर महाचे वेतन २० ते २५ तारखेच्या पुढेच वेतन अदा करण्याचे काम करतात. काही कर्मचार्यांनी अनेक बँकाचे व फायनान्सचे घर व दुचाकी तसेच मुलांच्या शिक्षण व विवाहासाठी कर्ज घेतलेले असते. त्या कर्जाचा हप्ता विशिष्ठ अशा २, ३, ५, ७ तारखांचे हप्ते वेळेवर वेतनातून कपात झाले नाही तर दर महा हप्त्याची रक्कम सोडून ७५०/- ते १०००/- ₹ नाहक भुर्दंड भरावा लागतो त्याच बरोबर हप्ते वेळेत कपात न झाल्यामुळे शास्तीची रक्कम भरावी लागते त्यामुळे आमची बँकांच्या आर्थिक व्यवहारात पत राहत नाहीत.
कामगार कायद्या प्रमाणे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार कर्मचार्यांचे दर महाचे वेतन ५ ते ७ तारखेपर्यंत अदा करणे हे बंधनकारक आहे. सदर विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी दरमहाच्या २० तारखेला संबंधीत वेतन अदा करणार्या लेखनिकाकडे दिली जाते. पण वेतन अदा करणारे लेखनिक काही ना काही कारणे सांगून वेतन बील करण्यास दिरंगाई करतात. वेळेत वेतन अदा करणे विषयीच्या लेखी तक्रारी पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) कडे केल्या त्या अनुशंगाने युनियनच्या वतीने कामगांराचे वेतन वेळेत करणे विषयी एकूण २३ लेखी पत्रव्यवहार देखील केला शिवाय युनियन पदाधिकाऱ्यांनी वारंवार प्रशासना बरोबर चर्चात्मक बैठका देखील घेतल्या तरी पण आमचे वेतन वेळेत अदा केले जात नाही.
त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. तसेच शिक्षण विभागात काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका व सेविका १९८० सालापासून तुटपुंज्या मानधनावर काम करतात. युनियनच्या वतीने सदर बालवाडी शिक्षिका व सेविकेच्या दर दोन वर्षीच्या वेतनात १०% वाढ होणे विषयीचा ठराव मांडला त्यानुसार महानगरपालिकेच्या मा. आयुक्तांनी १०% वेतन वाढीचा ठराव करून स्थायी समिती व जनरल बॉडीने मान्यता देऊन देखील शिक्षण विभाग त्याची अमंलबजावणी करत नाही. तसेच वैद्यकिय, अर्जित व बाळांतपणाची रजा देखील देत नाही शिवाय महानगरपालिकेची वैद्यकिय सहाय्य योजनेचा लाभ देण्याचे धोरण असताना देखील त्यापासून देखील आम्हाला वंचित ठेवले आहे. तसेच काही बालवाडी शिक्षिका व सेविका वयोपरत्वे सेवानिवृत्त झाल्या काही मृत्युमुखी पडल्या तरी त्यांच्या ग्रॅच्युटी व बोनस किंवा काही थकीत देय्य रक्कमा देखील वेळेवर अदा केले जात नाही.
तसेच शिक्षण विभागातील शाळेत लहान मुलांचे शालेय प्रोजेक्ट तयार करण्याचे साहित्त्याचा खर्च देखील बालवाडी शिक्षिकांना करावा लागतो तो खर्च सुद्धा प्रशासन देत नाही. मनपाच्या शाळेतील वरच्या वर्गाचे शिक्षक रजेवर असले की संबंधीत मुख्याध्यापक आम्हाला वर्ग घेण्यास भाग पाडतात तसेच सेविकेना वर्ग सफाईचे कामे देखील करून घेतली जातात अशा प्रकारे बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्यावर होणारा अन्याय थांबवावा असे युनियनच्या वतीने आवाहन करण्यात आले. सदर अंदोलनामध्ये युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे यांनी मार्गदर्शन करत असताना असे सांगितले की, “शिक्षण विभागात काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका,सेविका व शिपाई, रखवालदार यांचे वेतन वेळेत अदा नाही केले किंवा प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक करण्यास दिरंगाई व टाळाटाळ केल्यास संबंधीत कामचुकार व कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून अधिकारी व बील लेखनिकावर “मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम – १९४९, कलम ५६ (२) ब नुसार वेतनवाढ किंवा पदोन्नती रोखून ठेवणे यात दक्षता रोध ओलांडू न देणे” या शिक्षेची मागणी युनियनच्या वतीने करण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी असे खडे बोल कार्याध्यक्षांनी सुनावले.
सदर आंदोलनात युनियनच्या संयुक्त चिटणीस कॉ. रोहिणी जाधव, कार्यालयीन चिटणीस कॉ. वैजीनाथ गायकवाड, विभागीय अध्यक्ष कॉ. राम अडागळे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कॉ. करुणा गजधनी शिक्षण विभागाचे विभागीय अध्यक्ष कॉ. अजित मेंगे, सचिव कॉ. ओंकार काळे कॉ. कलावती खाटपे, कॉ. प्रिया ठाकर, केतकीे मटाले, वनीता कानडे, जेष्ठ सल्लागार कॉ. प्रकाश चव्हाण, कॉ. प्रकाश हुरकडली तसेच शिक्षण विभागाचे बालवाडी शिक्षिका, सेविका व रखवालदार, शिपाई या अंदोलनात सहभागी झाले.













