मोकळे केस, वाढलेली दाढी आणि गॉगल; ‘या’ अभिनेत्याचा लूक पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित; म्हणाले, ‘रामदेव बाबा…’

0

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषनं बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये देखील विशेष लोकप्रियता मिळवली आहे. धनुष त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. धनुष हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतो. सध्या धनुषचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील धनुषच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. काही लोक धनुषच्या या नव्या लूकचं कौतुक करत आहेत. तर काही जणं त्याला ट्रोल करत आहेत.

धनुष हाल सोमवारी (29मे) सकाळी एयरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी वाढलेले केस, वाढलेली दाढी आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमध्ये धनुष दिसला. एअरपोर्टवरील अनेक धनुषच्या चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढला. धनुषचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

धनुषच्या एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, त्याला नव्या अवतारात लोकांनी कसे ओळखले ? तो पूर्णपणे वेगळा दिसत आहे. तर दुसऱ्या युझरनं या व्हिडीओला कमेंट केली, ‘मला वाटतंय तो बाबा रामदेव यांचा बायोपिक बनवणार आहे.’ आणखी एका नेटकऱ्यानं धनुषच्या व्हिडीओला कमेंट केली, ‘रामदेव बाबांसारखा दिसत आहे.’