त्र्यंबकेश्वर प्रकरणात 5 जणांवर गुन्हे, हिंदू महासंघाचे कार्यकर्ते शुद्धीकरणासाठी मंदिरात दाखल

0

त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं. पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र पोलिसांना देण्यात आले होते.

तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघाची मागणी केली होती. राज्यातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्ये देखील घडला धक्कादायक प्रकार आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे यासंबधीचे आदेश काल गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

अशातच आता या घटनेच्या संदर्भात पोलिस तपास करत आहेत. तर या प्रकरणात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आज हिंदू महासंघ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू महासंघाचे नाशिक आणि पुण्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून राऊत सरकारवर घसरले , १०० वर्षांपासूनची ती परंपरा…
गेल्या काही दिवसात ही प्रकरण चर्चेत आलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत तपास चालू आहे. मंदिर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आलं आहे. या प्रकरणात 5 जणांवर गुन्हे दाखल झाले असून लवकरच त्यांना ताब्यात घेतलं जाईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!