राज ठाकरेंच्या सभेचे स्थान बदलले…

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणामध्ये रत्नागिरी शहरात सभा होत आहे. मात्र या सभेसाठी पक्षाने जे मैदान निवडले आहे, त्या मैदानावर सभा करण्यासाठी संबंधित संस्थेने नकार दिला आहे. यामुळे मनसेची सभा होणार की नाही, या बाबत संदिग्धता आहे. मनसेच्या अडचण दूर होणार की नाही, याबाबतही चर्चा होत आहे.

याबाबत एक बाब विशेष म्हणजे या संस्थेने मागील १० वर्षांपासून या मैदानावर कोणत्याही राजकीय सभेला मैदान दिलेले नाही. त्यामुळे मनसेलाही आम्ही हे मैदान उपलब्ध करून देणार नाही, असं संस्थेकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. मात्र मनसेने जवाहन मैदानावर सभा घेण्याचं निश्चित केलं आहे. संस्थेच्या या ताठर भूमिकेमुळे मनसेला नवीन मैदान शोधावं लागू शकतं. यामुळे निर्णयामुळे फार कमी दिवसात आता नव्या मैदानात मनसेला सभेची तयारी करावी लागण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंची तोफ ६ मे रत्नागिरी येथे धडाडणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

येत्या ६ मे रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा होणार असे मनसेकडून जाहीर करण्यात आलं होते, रत्नागिरी शहरातल्या एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर मनसेची सभा आयोजित करण्यात आले आहे. मात्र आज मनसेचे पदाधिकारी संबंधित संस्थेकडे मैदानासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना या राजकीय सभेसाठी नकार देण्यात आला.