लखनऊ : विद्यार्थी आता अयोध्याचा इतिहास तसेच रामायण, महाभारतचा करणार अभ्यास

0

लखनऊ : विद्यार्थ्यांना आता अयोध्येचा इतिहास, भगवान राम आणि त्यांची वंशावळी याबाबत सविस्तरपणे अभ्यास करता येणार आहे. लखनऊ विद्यापीठाने प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व विभागाला या सत्रापासूनच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे.

अयोध्या आणि आसपासच्या परिसरात केलेल्या उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्व अवशेषांचा तपशीलही या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. बीए (एनईपी)च्या चौथ्या सेमिस्टरमध्ये अयोध्येचा इतिहास शिकवला जाईल. विभागप्रमुख प्रा. पीयूष भार्गव म्हणाले की, रामायण, महाभारत आणि पुराणात अयोध्येचा उल्लेख आहे. या शहराची स्थापना राजा मनूने केली होती. इक्ष्वांकू, दशरथ आणि भगवान राम यांनी येथे राज्य केले. भार्गव म्हणाले की, अयोध्येच्या राजांच्या इतिहासासोबतच मातीची भांडी, शिल्प, दगडी शिल्पे, उत्खननात सापडलेले शिलालेख, शिक्के आणि नाणी याबाबतही विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सर्व्हे आणि उत्खनन हेही शिकवणार
n१८६२-६३ च्या सुमारास अलेक्झांडर कनिंगहॅम (भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक) यांनी केलेल्या सर्वेक्षणाचाही या अभ्यासक्रमात समावेश आहे. १८८९-९१ या काळात ए. फ्यूहररने अयोध्येचे सर्वेक्षणही केले.
nयाशिवाय इतर सर्वेक्षणे आणि उत्खननात समोर आलेली तथ्ये, अयोध्येची सर्व प्रसिद्ध नावे आणि चिनी प्रवासी फाह्यान याला शा-ची नावाने का संबोधत होते, हेही शिकवले जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका
२००२-०३ च्या उत्खननाचाही अभ्यासक्रमात समावेश आहे. या उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांनी राम मंदिराबाबत कोर्टाच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावली. भीमबेटका, कालीबंगा आणि हस्तिनापूर येथील पुरातत्त्व उत्खनन, अयोध्येशी संबंधित इतर प्राचीन स्थळांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती