डिझानर अनीक्षा जयसिंघानी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची नावं असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. डिझानर अनीक्षा जयसिंघानी हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका संदेशात तिचे वडील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते, असा दावा मुंबई पोलिसांनी सोमवारी सत्र न्यायालयात केला आहे.
अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या आणि नंतर त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या या कटात विविध राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असा दावाही पोलिसांनी केला. तसेच याची चौकशी करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाला सांगितले. अनीक्षाच्या जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांनी उपरोक्त दावा केला. अमृता फडणवीस धमकी प्रकरणात कोर्टाने सोमवारी संशयित बुकी अनिल जयसिंघानीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. जयसिंघानीला गुजरातेतून चुलत भाऊ निर्मलसह अटक करण्यात आली होती. या दोघांना सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी. आल्मले यांच्यासमोर हजर करण्यात आले.
नेमकं काय आहे प्रकरण?
अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल 1 कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती. तसेच, डीझायनर धमकावण्याचा प्रयत्न करत होती. याप्रकरणाच तपास सुरु असून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत.