उध्दव ठाकरेंना दिलासा; HC ने गौरी भिडेंची याचिका फेटाळली, २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला

0

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दाखल याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना कोर्टाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करावी यासाठी गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. भिडे यांची ही याची उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी करत ही याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल केली परंतु त्यामध्ये काही पुरावे नसल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

गौरी भिडे यांनी प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. कोरोना काळात इतर वृत्तपत्रांना तोटा सहन करावा लागत असताना सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता. तर साडे अकरा कोटी रुपये नफा होता, हे कसं शक्य झालं? अशी मागणी गौरी भिडे हायकोर्टात केली आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रानुसार, उद्धव ठाकरेंची एकूण संपत्ती जवळपास 125 कोटींची संपत्ती आहे. तसेच्या त्यांच्यावर एकूण बँकेचं कर्ज 4 कोटी रुपये आहे. आदित्य ठाकरेंकडेही जवळपास 15 कोटींची संपत्ती आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता