विराटने कसोटी शतकाचा दुष्काळ संपवताच लावली विक्रमांची रांग, विक्रमांची ही यादी

0
1

अहमदाबादमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ स्पर्धेतील चौथा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीने दीडशतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये आपला शतकाचा दुष्काळ संपवला आहे. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये कोहलीने १२०५ दिवसांनी शतक झळकावले. त्याचबरोबर त्याने या शतकाच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावार केले आहेत. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा एक विश्वविक्रम मोडल्याचा समावेश आहे.

चेंडूनुसार कसोटी क्रिकेटमधील कोहलीचे हे दुसरे संथ शतक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४१ चेंडूत हे शतक झळकावले. त्याचवेळी, किंग कोहलीने २८९ चेंडूंचा सामना करताना २०१२ मध्ये नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संथ शतक ठोकले होते.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

चेंडूंच्या बाबतीत कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात संथ शतक-
२८९ विरुद्ध इंग्लंड नागपूर, २०१२
२४१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अहमदाबाद, २०२३*
२१४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ, २०१८
१९९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅडलेड, २०१२
१९९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नई, २०१३

त्याचवेळी, कोहलीचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १६ वे शतक आहे. तसेच एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक २० शतके झळकावण्याचा विक्रम आहे.

एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे फलंदाज-
२० सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१९ डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड
१७ सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका
१६ विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
१६ विराट कोहली विरुद्ध श्रीलंका

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली खूप पुढे गेला आहे. जो रूट ४५ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली आता त्याच्यापेक्षा ३० शतकांनी पुढे आहे.

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके:
विराट कोहली – ७५*
जो रूट – ४५
डेव्हिड वॉर्नर – ४५
रोहित शर्मा – ४३
स्टीव्ह स्मिथ – ४२

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला –
विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७५ वे शतक आहे. त्याने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला आहे. कोहलीच्या आधी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ५६६ डावांत ७५ शतके पूर्ण केली, तर कोहलीने ५५२ डावांत हा पराक्रम केला.
कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीचा हा सर्वात मोठा शतकाचा दुष्काळ आहे. २७व्या शतकानंतर त्याने २८वे शतक पूर्ण करण्यासाठी एकूण ४१ डाव घेतले. यापूर्वी त्याने ११वे ते १२वे शतक यादरम्यान ११ डाव घेतले होते. या शतकाने कोहलीने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे