धंगेकरांचा आमदारपदाचा ९ मार्चला शपथविधी नेत्यांचीही घेणार भेट: कामाकाजातही सहभाग

0

भाजपचा गड मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मतांच्या चांगल्या मताधिक्याने विजय खेचून आणला. विजय मिळवल्यानंतर आता रवींद्र धंगेकरांची एकच हवा आहे. धंगेकर आता मुंबईचा दौरा करणार आहेत.

कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर उद्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात ते भेटीगाठींचा सपाटा लावणार आहेत. मुंबईत ते महाविकास आघाडीमधील विविध नेत्यांची भेट घेणार आहेत. रवींद्र धंगेकर उद्या सकाळी ८ वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबईत काँग्रेसचे वरिष्ठ नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत. धंगेकर मुंबईला गेल्यामुळे ते आपले पूर्वाश्रमीचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ही भेट घेणार असल्याची शक्यता आहे. मात्र याबद्दल दुजोरा मिळालेला नाही.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

दरम्यान रवींद्र धंगेकर यांची २ मार्च रोजी आमदारपदी निवड झाली. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आता सात दिवसांनी म्हणजेच ९ मार्च रोजी रवींद्र धंगेकर यांचा आमदार पदाचा शपथविधी ९ मार्च रोजी होणार होणार आहे. यानंतर धंगेकर हे विधिमंडळाच्या कामाकाजात सहभाग घेऊ शकतात. हे आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांचा आमदार म्हणूव सभागृहात समावेश होणार आहे.