शिवसेना ठाकरे गट 4 एबी फॉर्म चोरीचा दिवसभर खेळ; लोकशाहीला काळीमा तक्रार अधिकाऱ्यांचे हेतू:हा दुर्लक्ष

0

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता नगरपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जात आहे. परंतु, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चार एबी फॉर्म चोरून अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांना लेखी कळवूनही त्यांचे अर्ज वैध ठरवल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.

राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. निवडणूक प्रक्रियेमधील विसंगती, परिपत्रकातील अचानक बदल आणि फसवणुकीच्या चार नामांकन अर्जाबाबत देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राहता नगरपरिषदेमध्ये आम्ही आघाडी म्हणून लढत असताना शेवटच्या दिवशी आमच्या पक्षाच्यावतीने चार अर्ज दाखल केले गेले. याची माहिती मिळताच पीठासीन अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवून हे अर्ज बाद करण्याची मागणी केली. हे अर्ज छाननीमध्ये बाद करणे अपेक्षित होते, असे देसाई म्हणाले.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

आमचा पक्ष महाविकास आघाडीमधून लढत असून हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. ज्या लोकांनी अशाप्रकारचे कृत्य केले त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. एवढे करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेता ज्यांनी शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल केले ते वैध ठरवले गेले, असे सांगतानाच आता मतचोरीबरोबरच आमच्या पक्षासोबत एबी फॉर्म चोरीचा खेळ खेळत आहेत. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये भयानक असून लोकशाहीच्या मूल्यांना काळीमा फासणारा प्रकार आहे, अशी टीकाही देसाई यांनी केली.