डॉ. आंबेडकर चौक वाहतूक कोंडी मुक्तीसाठी आयुक्त अन् खासदार सुप्रियाताई यांची संयुक्त पाहणी

0

प्रभाग क्र. ३० कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी या ठिकाणी मुख्य NDA रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. या मुख्य चौकातून अनेक नागरिक वाहतूक करत असून सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या या कोंडीवर मनपातर्फे कार्यवाही केली जावी, यासाठी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम व संसद रत्न खासदार प्रयत्न यांनी नुकतीच संयुक्त पाहणी केली.

स्थानिक नगरसेवक म्हणून प्रशासनाशी वेळोवेळी संवाद साधत वाहतूक कोंडी सुटण्याची मागणी केली करीत आलो आहे, तसेच वेळप्रसंगी आंदोलनही करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. सदर मागणीला प्रशासनाने अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने सदर समस्या अधिकच जटील बनत गेली आहे. असा आरोप श्री स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने अध्यक्ष – कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष  यांनी भेटीच्या वेळी केला. या गंभीर विषयावर पंधरा दिवसांपूर्वी आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांच्यातर्फे मनपा आयुक्त यांच्याकडे सदर समस्येवर उपाययोजना करण्यात यावी, यासाठी वेळ मागितली होती त्यानुसार आज मा. सुप्रियाताईंच्या सोबत मनपा आयुक्त श्री. नवलकिशोर राम आणि अतिरिक्त मनपा आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांना प्रत्यक्ष ठिकाणी नेऊन परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात आणून दिले असून सदर चौकातून प्रस्तावित मेट्रो रूट असल्याने मेट्रोचे अधिकारी – पणे मनपा पथ विभागाचे अधिकारी – पणे मनपा प्रकल्प विभागाचे अधिकारी यांची एकत्रित महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सदर बैठकीमध्ये रस्त्यांचे काम करणारा मनपाचा पथ विभाग, शहरातील उड्डाणपुलांचे काम करणारा प्रकल्प विभाग आणि मेट्रो विभाग यांनी उपस्थित राहून एकमेकांशी समन्वय साधत सदर विषयावर सूचना घेऊन पुढील उपाययोजना करिता त्वरित हालचाली चालू करण्यात याव्यात अशी विनंती केली आहे. याप्रसंगी आदरणीय खा. सुप्रिया ताई आणि अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सदर बैठक आयोजित करत यावर विचारविनिमय केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने दिली आहे. येत्या काळात सदर समस्या अधिक उग्र स्वरूप प्राप्त करणार असून ही परिस्थिती टाळण्यासाठी दुभाजक, उड्डाणपूल याचसह सर्वच गोष्टींचा विचार करत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक सचिनजी दोडके, अनिताताई इंगळे, त्र्यंबक अण्णा मोकाशी, प्रमोदजी शिंदे, किशोरजी शेडगे, वैभवजी कोठुळे उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार