मुंबई दि. १५ (रामदास धो. गमरे) “धम्मपद हा बौद्ध धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि पवित्र ग्रंथ आहे, जो पाली भाषेत लिहिला गेलेला असून या ग्रंथात भगवान बुद्धांच्या शिकवणीचा सार आणि त्यांचे जीवन-मूल्यांचे तत्व स्पष्टपणे मांडले गेले आहे. ‘धम्म’ म्हणजे धर्म किंवा नीती व ‘पद’ म्हणजे वचन किंवा भाष्य. त्यामुळे ‘धम्मपद’ म्हणजेच ‘धर्मवचनांचा ग्रंथ’. या ग्रंथात जवळपास २६ विभागांमध्ये ४४३ श्लोक आहेत जे इसवीसनाच्या दुसऱ्या ते चौथ्या शतकात लिहिले गेले आहेते, बुद्ध धम्मात सांगितलेली तत्वे ही मुख्यत्वे नीती, शांती, मुक्ती, सद्गुण आणि ध्यान यावर आधारित आहेत. भगवान बुद्धांनी आपले विचार मांडताना एक गोष्ट स्पष्ट केली की ‘सर्व काही मनातून उत्पन्न होते.’ ज्ञानप्राप्तीच्या नंतर बुद्धांनी पहिली धम्मसंगीती राजगृह येथे तर दुसरी आणि तिसरी वैशाली येथे आयोजित केली होती. या तीन धम्मसंगीतीतून एकूण ८४ हजार स्कंद लिहिले गेले आणि त्यातूनच पुढे बौद्ध ग्रंथसंहितेचा महत्त्वाचा भाग त्रिपिटक या ग्रंथाची निर्मिती झाली. बौद्ध इतिहासात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सम्राट अशोक त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रास धम्मप्रचार व प्रसारासाठी भारतातून सिहलोन (आता श्रीलंका) येथे पाठवले होते. या प्रयत्नामुळे आज आपण ज्या प्रमाणात बौद्ध धम्माचे दर्शन घेतो, त्याची पायाभरणी झाली आहे तोच आदर्श पुढे नेत आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० साली श्रीलंकेत जाऊन बौद्ध धर्माचे अभ्यास केला व त्यांनी बौद्ध आचारसंहिता म्हणजेच धम्मविधी पुस्तिका तयार केली आणि धम्मदिक्षा वेळी २२ प्रतिज्ञा देऊन बहुजन समाजाच्या जीवनाला एक नवीन दिशा दिली बुद्धधर्माचे हे संदेश अत्यंत साधे आणि प्रगल्भ आहेत परंतु मानवी जीवनाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आहेत परंतु त्यासाठी निर्मळ मनाची आवश्यकता आहे म्हणून तुमचं मन शुद्ध असेल तर सुख तुमच्या सावलीबरोबर चालत येईल” असे प्रतिपादन प्रवचनकार अशोक राजू कासारे यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वर्षावास मालिकेचे अकरावे पुष्प गुंफत “बुद्धाचे धम्मपद” या विषयावर बोलत असताना केले.






बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे अकरावे पुष्प कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रस्ताविक सादर केले त्यावेळी प्रवचनकार अशोक कासारे यांची सभागृहाला ओळख करून दिली तसेच २२ सप्टेंबर पासून होणाऱ्या श्रामनेर शिबिरात सहभागी होण्यासाठी २६ जणांनी नावनोंदणी केली असून अजून कोणाला सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी नावनोंदणी करावी असे आवाहन केले सोबतच स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्या यांनी सढळ हस्ते धम्मदान करीत आपली मदत ऑक्टोबर पर्यंत जमा करावी असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी प्रवचनकार अशोक कासारे “बुद्धाचे धम्मपद” या विषयावर बोलत असताना त्यांनी अत्यंत महत्वाची मांडणी करीत इतका मोठा व प्रगल्भ इतिहास सर्वसामान्यांनाही समजेल इतक्या साध्या व सोप्या परंतु प्रभावी भाषेत अनेक सौंदहरणास सखोल माहिती दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा दिल्या परंतु त्याव्यतिरिक्त अजून तीन प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्या जीवनात घेतल्या होत्या त्यातील पहिली १९३५ साली “मी हिंदुधर्मात जरी जन्म घेतला तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही” सोबतच रमाईने पंढरपूरला जाण्याचा आग्रह धरला त्यावेळी बाबासाहेब म्हणाले ज्याठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायची परवानगी नाही अश्याठिकानी न जाता आपलं स्वतःच पंढरपूर निर्माण करू” ही दुसरी प्रतिज्ञा ही त्यांनी पूर्ण केली व समाजाच्या हिताचा विचार करून समाजाच भलं करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती त्याप्रमाणे समाजाला बुद्ध धम्मदिक्षा देऊन त्यांनी आपली तिसरी प्रतिज्ञा ही पूर्ण केली. असे नमूद केले. सदर प्रसंगी उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेत आपला ठसा उंमटवणाऱ्या महाड क्रांतीभूमीचे सुपुत्र तुकाराम घाडगे यांचा ५६ वा वाढदिवस असल्यांने बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समितीच्या वतीने त्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांना सन्मानित करून त्यांना पुढील वाटचालीस मंगलकामना देण्यात आले.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, लवेश जाधव, यशवंत कदम, प्रकाश जाधव गुरुजी, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, संतोष सावरकर, संदेश गमरे, तुकाराम घाडगे, प्रकाश करुळेकर, माजी चिटणीस प्रकाश कासे, सुशीलाताई जाधव, अंजलीताई मोहिते, प्रमिलाताई मर्चंडे, सचिव सावी, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी तुकाराम घाडगे व त्यांची पत्नी सौ. तेजस्वी घाडगे, सुपुत्र सम्यक घाडगे व सुजात घाडगे यांच्या वतीने उपस्थित उपासक उपासिकांना धम्मदानस्वरूपात अल्पोपहार देण्यात आला. सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, प्रवचनकार अशोक कासारे व अल्पोपहार देणाऱ्या तुकाराम घाडगे व त्यांच्या परिवाराचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.











