कर्वेनगर वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रभागातील शाहू कॉलनी या ठिकाणी मुख्य पाणंद रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला असला तरीही पुणे महापालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या या कामाची व मुख्य कर्वेनगर मार्केट मधील विकास मित्र मंडळ चौक ते मावळे आळी मुख्य रस्ता अत्यंत बिकट झाल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय लक्षात घेऊन कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी गेल्या तीन ते चार महिन्यापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. संबंधित पाठपुराव्याला यश आले असून पुणे महापालिकेच्या पथविभागाच्या वतीने आज कामाची पाहणी केली असून आगामी उत्सव काळामध्ये नागरिकांना त्रास न होण्यासाठी आवश्यक त्या विनंती- सूचना करण्यात आल्या आहेत.






कर्वेनगर विकास चौक ते मावळे आळी या मुख्य रस्त्याची अवस्थाही अत्यंत बिकट बनली होती. ठिकठिकाणी खडी निघाली असून रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. याबाबत पुणे मनपाचे पथ विभागाचे मुख्य अभियंता श्री. हांडे साहेब आणि कनिष्ठ अभियंता भोंडे साहेब यांनी प्रत्यक्ष ठिकाणी नेऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. असून नागरिकांची या नाहक त्रासातून सुटका करावी, अशी विनंती दुधाने यांच्या वतीने केली असून अधिकारी वर्गानेही यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचा शब्द दिला असल्याचे श्री स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने अध्यक्ष – कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष यांनी सांगितले.










