वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी – इंग्लंडमध्ये १५ छक्क्यांसह ३४ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडला!

0
22

भारताच्या युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने केवळ १४व्या वर्षी क्रिकेट इतिहासात आपले नाव अजरामर केले आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या अंडर-१९ टेस्ट सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या संघांनी मिळून तब्बल १४९७ धावा करत ३४ वर्ष जुना जागतिक विक्रम मोडीत काढला. या ऐतिहासिक सामन्याचा भाग बनून वैभव सूर्यवंशीने आपल्या दमदार कामगिरीची छाप उमटवली.

साल १९९१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या अंडर-१९ टेस्ट सामन्यात चेल्म्सफोर्ड येथे एकत्रितपणे १४३० धावा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३४ वर्ष हा विक्रम अबाधित होता. मात्र १५ जुलै २०२५ रोजी बेकेनहम येथे खेळल्या गेलेल्या भारत-इंग्लंड अंडर-१९ टेस्टमध्ये १४९७ धावा करून हा विक्रम इतिहासजमा झाला.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

या सामन्यात भारताच्या अंडर-१९ संघाने दोन डावांत मिळून १० छक्क्यांसह ७४८ धावा केल्या, तर इंग्लंडने ५ छक्क्यांसह ७०९ धावा फटकावल्या. भारताच्या धावसंख्येत वैभव सूर्यवंशीने १२ चौकार आणि १ छक्का मारून ७० धावा केल्या आणि सामन्यावर ठसा उमटवला.

वैभव सूर्यवंशी याने यापूर्वी वनडे मालिकेतही १४३ धावांची झंझावाती खेळी करत सर्वाधिक धावा केल्या होत्या. भारताने ही वनडे मालिका ३-२ ने जिंकली होती. विशेष म्हणजे, यूथ टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा झालेल्या टॉप ५ सामन्यांमध्ये इंग्लंडचा अंडर-१९ संघ प्रत्येक वेळी सहभागी राहिलेला आहे, हे देखील एक वेगळं वैशिष्ट्य ठरत आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप