आगामी ‘स्थानिक’ निवडणुका अजितदादा ‘अ‍ॅक्शन’मध्ये कामाला लागा कार्यकर्त्यांना आदेश; नेमकं काय म्हणाले?

0
1

पुणे : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. यामध्ये राज्यातील मोठ्या महापालिकेसाठी राजकीय धुरिणांना मोठी कसरत करावी लागणार आहेत. यातच पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जनमानसात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.

पुण्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीकरिता संघटना वाढीच्या सूचना दिल्या आहेत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ‘निवडणुका जवळ आल्या आहेत, मी पालकमंत्री आहे. पुणे महानगरपालिका आमच्याकडे होती. अनेक वर्ष दोन्ही महानगरपालिका सत्तेत होतो. आता आगामी निवडणुकीसाठी संघटना वाढवण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.’ तर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना म्हटले की, निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल, आपण आपली प्रत्येक प्रभागात तयारी करा. पुण्यात प्रत्येक प्रभागापर्यंत पक्ष पोहोचवा, सदस्य नोंदणी करा, मी स्वतः पुण्यात पक्षात लक्ष घालेन, या सर्वांचा मी ऑगस्ट महिन्यात आढावा घेईन’

दरम्यान, नवीन शहराध्यक्षांना कार्यकारिणी तयार करून कामाला लागण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या. तसेच ‘निवडणुका एकत्रित लढवायच्या का यामध्ये सगळे निर्णय युतीबाबत वरिष्ठ घेतील,’ असेही पवारांनी नमूद केले आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला