पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावाच्या समस्या जटील असतानाच शासकीय लालफीतीच्या कारभाराची झळ चिमुकल्यांच्या ही नशिबी आली असून आज मी तिला या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणाऱ्या सुमारे 600 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असून प्रशासन मात्र लाल भीतीच्या कारभारात गुंग असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या वादळी वाऱ्यांचे दिवस असून धोकादायक पद्धतीने मारलेले पत्रे व शेजारील जीर्ण झालेल्या वास्तूमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खाजगी डेव्हलपरने या ठिकाणी पञ्याचे कुंपण घातलेले असून विद्यालयाचा वहिवाटीचा व विद्यार्थ्यांचा ये-जा करण्याचा रस्ता अडविला असून फक्त ४ फुट रुंदीचा रस्ता शिल्लक राहिला आहे. नामदेवराव मोहोळ विद्या व कीड़ा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय बावधन, ता. मुळशी जि. पुणे हे मराठी माध्यमाचे शासनमान्य अनुदानित विद्यालय सन १९९२ पासून गेली १३ वर्ष बावधन परीसरात ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. विद्यालयामध्ये सध्या इयत्ता ८वी ते १० वी चे सहा वर्ग असून ५२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
संस्थेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय व्हावी या उद्देशाने खरेदी दस्त क ५३२४/२००६ दि.२४.०७.२००६ अन्वये स्व मालकीची स्वतन्त्र इमारत बांधून दिली आहे. बावधन बु. गामपंचायतीत मिळकत कमांक ९८८ अशी नोंदही असल्याने पुणे म.न.पा. मध्ये समाविष्ठ झाल्याने मिळकत क. P/T/02/09503000 असा बदल होऊन विद्यालयास या प्रमाणे मिळकत करही लावण्यात आले आहे. याबाबत कोणतीही कारवाई व नियमाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास लोकशाही मार्गाने रास्ता रोको, धरणे आंदोलन, उपोषण करण्याचा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. संबंधिताना बांधकाम करावयाचे असल्यास Land Lock जमिनी अंतर्गत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी तोपर्यंत त्यांना या ठिकाणी बांधकामास परवानगी देण्यात येवू नये अशी विनंतीही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे आयुक्त मा. योगेश म्हसे (भा.प.से.) संस्थेच्या वतीने लेखी अर्जाद्वारे केली आहे.