राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रीकरण पूर्णविराम? शरद पवारांच्या भूमिकेवर अजितदादांचीही पहिली प्रतिक्रिया…

0

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार याची जोरदार चर्चा चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठं विधान केले आहे. संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही. तसेच भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही, असे पवार म्हणाले आहेत. पिंपरी चिंचवडमधील पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर उलटसुलट चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेटपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही. संधीसाधू करण्यांसोबत जाऊ शकत नाही, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर पडदा टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

शरद पवार यांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असल्याचे अजितदादा म्हणाले आहेत.