वाघोली पोलिस ठाणं – छताशिवाय प्रशासन! खुल्या आकाशाखाली काम करत आहेत अधिकारी, मूलभूत सुविधा नाहीत

0
3

उद्घाटनाच्या गाजावाज्यानंतरही ठाण्याची स्थिती बिकट, तरुण समाजकार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना जर स्वतःच्याच कामाच्या जागी बसायला जागा, प्यायला पाणी, वावरण्यासाठी छप्पर नसेल, तर काय म्हणावं? पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्याची ही विदारक स्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अधिकाऱ्यांना उघड्यावर, उन्हातान्हात, खुर्च्या टाकून काम करावं लागत आहे.

उद्घाटन मोठं, पण अंमलबजावणी शून्य!
वाघोली पोलिस ठाण्याचं स्वतंत्र उद्घाटन ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात झालं. पुण्यातील नांदेड सिटी, बाणेर, खळदपाडळ, फुरसुंगी, खराडी, आंबेगाव आणि वाघोली — या सात नव्या पोलिस ठाण्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शिवाजीनगर मुख्यालयात पार पडला. परंतु प्रत्यक्षात वाघोली पोलिस ठाण्याची अवस्था अजूनही ‘चौकी’पेक्षा फार वेगळी नाही.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

अधिकारी कोणत्या अडचणींना सामोरे जात आहेत?

  • कर्मचारी कमतरता – ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे, परिणामी ताणतणाव वाढतोय.
  • मूलभूत सुविधा नाहीत – स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, बसण्यासाठी योग्य जागा, नागरिकांसाठी समुपदेशन कक्ष… काहीच नाही!
  • ढासळलेली पायाभूत व्यवस्था – अर्धवट उभारणी, छप्पर नसलेली जागा, कुठेही नागरिकांची गोपनीयता राखली जात नाही.
  • खुल्या आकाशाखाली कार्यालय – काही खुर्च्या टाकून अधिकारी तक्रारींची नोंद घेतात.

स्थानिक युवकांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत
वाघोलीतील तरुण समाजसेवक ओंकार तुपे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ही स्थिती पाहून आश्चर्यचकित झाले. ठाणे अमलदार फाईल्स घेऊन बाहेर बसलेले दिसले. “हे अधिकारी रात्रंदिवस सेवा देतात, पण त्यांना स्वतःसाठी नीट जागा नसेल तर हे दुर्दैवच आहे. आम्ही फोटो मुख्यमंत्र्यांना मेल केले आणि त्वरित कारवाईची मागणी केली,” असं तुपे म्हणाले.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

“या अवस्थेमुळे पोलिसांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मणक्याचे त्रास होण्याची शक्यता वाढते. अशा तणावाखाली सतत काम करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं,” असा इशाराही त्यांनी दिला.

पोलिस उपायुक्तांचं स्पष्टीकरण
पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी परिस्थितीची कबुली दिली. ते म्हणाले, “सध्या जे ठिकाण वापरात आहे ते पूर्वीची चौकी होती. नव्या ठाण्याच्या इमारतीसाठी जागा मंजूर झाली आहे. मोजमाप प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, तात्पुरती जागा शोधत आहोत.”

“एक पोलिस ठाणं म्हणजे फक्त ऑफिस नाही, तिथे पार्किंग, मुद्देमाल साठवण्यासाठी जागा, तक्रारी घेण्याची सोय लागते. त्यामुळे तीव्र गरज आहे की ठोस उपाययोजना त्वरीत राबवाव्यात,” ते पुढे म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

काय गरज आहे?

  • नवीन इमारतीचे त्वरित काम सुरू करणे
  • तात्पुरती जागा देऊन सन्मानजनक कामकाज सुरू ठेवणे
  • मूलभूत सुविधा जसे की पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वेटिंग एरिया उपलब्ध करून देणे
  • कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे

उद्घाटनानंतर वर्ष उलटूनही वाघोली पोलिस ठाणं अद्याप उघड्यावरच काम करतंय. पोलिसांप्रमाणेच त्यांच्या कार्यस्थळालाही सुरक्षितता आणि सन्मान हवा. हा मुद्दा केवळ प्रशासनाचा नाही, तर कायदा-सुव्यवस्थेचा आहे.