माळेगाव (ता. बारामती) कारखाना निवडणूकीत २१ जागांसाठी चौरंगी लढत होणार हे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उमेदवारी कायम राहिली. त्यांनी आपल्या सत्ताधारी नीळकंठेश्वर पॅनेलमध्ये 7 विद्यमान संचालक, तर 5 माजी संचालकांनाही पुन्हा निवडणूक रिंगणात उरविले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेही बळीराजा सहकार बचाव पॅनेलचे अधिकृत उमेदवार जाहीर केले व आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याचे सांगितले.






पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे यांनीही सहकार बचाव शेतकरी पॅनेलमधून तडगे आव्हान उभे केले. कष्टकरी शेतकी समितीने व अपेक्षांनीही या निवडणूकीत मोट बांधली असून उद्या (ता. १३) रोजी उमेदवार यादी जाहीर करणार आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचावर्षीक निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. गेली अनेक दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये युती होईल असे सांगण्यात येत होते. संबंधितांमध्ये तडजोडीसाठी बैठका झाल्या.
त्या बैठकीचे केंद्र स्थानी अजित पवार यांच्यावतीने छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पुथ्वीराज जाचक, किरण गुजर,राजवर्धन शिंदे, अॅड. केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, मदनराव देवकाते आदी नेते होते. पारंपारिक विरोधकमध्ये चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनीच संबधितांबरोबर चर्चा केली.
तसेच शरद पवार गटाकडून अॅड. एस. एन. जगताप, गणपत देवकाते यांनी अजित पवार यांच्याशी बैठक केली. प्रत्यक्षात मात्र युती होण्याच्या प्रक्रियेचे चांगभल झाल्याचे उघड झाले. या प्रमुख पदाधिकार्यांना आपापले पॅनेल निवडून आण्यासाठी आता सभासदांच्या अपेक्षांचा डोंगर आणि आव्हानांची मोठी दरी पार करावी लागणार आहे.
गट निहाय नावे पुढील प्रमाणे –
नीळकंठेश्वर पॅनेल
माळेगाव गट –
बाळाहेब पाटील तावरे, शिवराज प्रतापसिंह जाधवराव, राजेंद्र सखाराम बुरूंगले.
पणदरे गट –
तानाजी तात्यासाहेब कोकरे, स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप.
सांगवी गट –
विजय श्रीरंगराव तावरे, विरेंद्र अरविंद तावरे, गणपत चंद्रराव खलाटे,
खंडाज-शिरवली गट –
प्रताप जयसिंग आटोळे, सतिश जयसिंग फाळके.
निरावागज गट –
जयपाल निवृत्ती देवकाते, अविनाश गुलाबराव देवकाते. बारामती गट –
नितीन सदाशिव सातव, देविदास सोमनाथ गावडे
ब वर्ग संस्था मतदार संघ-
अजित अनंतराव पवार
अनुसूचित जाती जमाती –
रतनकुमार साहेबराव भोसले
महिला राखीव प्रतिनिधी –
संगिता बाळासाहेब कोकरे, सौ. ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले. इतर मागास प्रवर्ग –
नितीन वामनराव शेंडे.
भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग –
विलास हृषिकांत देवकाते.
सहकार बचाव शेतकरी पॅनेल –
माळेगाव गट –
रंजनकुमार शंकरराव तावरे, संग्राम गजानन काटे, रमश शंकराव गोफणे.
पणदरे गट –
सत्यजित संभाजीराव जगताप, रणजित शिवाजीराव जगताप, रोहन रविंद्र कोकरे.
सांगवी गट –
चंद्रराव कृष्णराव तावरे, रणजित वीरसेन खलाटे, संजय बाबुराव खलाटे.
खांडज-शिरवली गट –
विलास नारायण सस्ते, मेघशाम विलास पोंदकुले.
निरावागज गट –
राजेश सोपान देवकाते, केशव तात्यासाहेब देवकाते. बारामती गट –
गुलाबराव बाजीराव गावडे, वीरसिंह उर्फ नेताजी विजयसिंह गवारे.
ब वर्ग मतदार संघ
भालचंद्र बापूराव देवकाते,
अनुसूचित जाती-जमाती
बापूराव अप्पाजी गायकवाड,
महिला राखीव प्रतिनिधी
राजश्री बापूराव कोकरे, सुमन तुळशीराम गावडे
इतर मागास प्रवर्ग
रामचंद्र कोंडीबा नाळे
भटक्या विमुक्त जाती व जमाती
सुर्य़ाजी तात्यासाहेब नाळे.
बळीराजा सहकार बचाव पॅनेल –
माळेगाव गट –
अमित चंद्रकांत तावरे, राजेंद्र दौलत काटे, श्रीहरी पांडुरंग येळे.
पणदरे गट –
सुशीलकुमार उत्तम जगताप, दयानंद चंद्रकांत कोकरे, भगतसिंग आबा जगताप.
सांगवी गट-
संजय नामदेव तावरे, राजेंद्र अशोक जाधव, सुरेश तुकाराम खलाटे.
खांडज-शिरवली गट –
सोपान तुकाराम आटोळे, तानाजी भागुजी आटोळे. निरावागज गट –
गणपत शंकर देवकाते, शरदचंद्र शंकरराव तुपे.
बारामती गट –
प्रल्हाद गुलाबराव वरे, अमोल देविदास गवळी.
महिला राखीव –
शकुंतला शिवाजी कोकरे, पुष्पा मोहन गावडे.
इतर मागास वर्गातून
भारत दत्तात्रेय बनकर, ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले.
अनुसूचित जाती- जमाती मतदार संघ
राजेंद्र श्रीरंग भोसले.











