बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आदिती पवार यांचे अभिनंदन

0

गुहागर दि. १२ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, पेवे विभाग क्र. २, शाखा निगुंडळ या शाखेचे माजी सभासद तसेच माजी निवृत्त मुख्यध्यापक दिवंगत दत्ताराम पवार यांची सून सौ. आदिती (सोना) विनायक पवार, मौजे निगुंडळ हिने मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याने बौद्धजन सहकारी संघ, गाव व मुंबई शाखा आणि शिक्षण समिती यांच्या वतीने सौ. आदिती (सोना) विनायक पवार यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे.

सौ. अदिती पवार यांनी संसार सांभाळून चिकाटी आणि ध्येय उराशी बाळगून मोठ्या पराकाष्ठेने यश संपादन केल्याने समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कळमुंडी गावचे सुपुत्र मोतीराम रामचंद्र मोहिते आणि सुगंधा मोतीराम मोहिते यांच्या द्वितीय सुकन्या आदिती पवार यांना लहानपणापासूनच डॉक्टर, वकील अशी उच्चपदवीधारक उच्चशिक्षित होण्याची इच्छा होती म्हणून त्याच दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले त्यांचे पती विनायक दत्ताराम पवार यांनी आपली सुविद्य पत्नी आदिती हिच्या उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठा पाठिंबा दिला म्हणून त्यांचे ही संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे, विनायक दत्ताराम पवार व सौ. आदिती विनायक पवार या उभयतांस पुढील उज्वल कारकिर्दीसाठी बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा देण्यात येत आहे असे बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात कार्याध्यक्ष दीपक मोहिते, सरचिटणीस संदेश गमरे आणि सहकाऱ्यांनी नमूद केले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार