आरोग्य सेवकांच्या आरोग्याची प्रशासनाकडून हेळसांड… आंबील ओढा स्वच्छता कर्मचारी कॉलनी अस्वच्छतेच्या घेऱ्यात

0

पुणे – पुणे शहर स्वच्छ सुंदर राहावे म्हणून जिवाचे रान करणारे स्वच्छता कर्मचारी, पुणे मनपातील इतर कर्मचारी राहत असलेल्या प्रभाग क्रमांक २९ मधील सानेगुरुजी नगर,आंबील ओढा पी एम सी कॉलनी कचऱ्याच्या, राडा रोड्याच्या समस्येने त्रस्त झाली आहे. सदर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडी प्रभाग २९ च्या वतीने पुणे मनपा आयुक्त तसेच उपायुक्त पुणे मनपा, क्षेत्रीय अधिकारी विश्रामबाग कार्यालय यांना लेखी पत्र देण्यात आले आहे.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी, इतर सेवक वर्ग पुणेकरांच्या आरोग्याची काळजी घेत असतो, पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो, अश्या पुणे मनपाच्या सेवकांच्या सानेगुरुजी नगर आंबील ओढा येथील कॉलनीत अस्वच्छतेचे कळस गाठला आहे ,त्यात आकाशातून वरुणराजा बरसत आहे त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे, सेवकांच्या कुटुंबामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या शहरात पुन्हा संसर्गाचे रोग, पोटाचे विकार यांनी डोके वर काढले आहे त्यामुळे सेवकांच्या आरोग्याची काळजी नक्की कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

कारण प्रशासन प्रभागातील विविध टेंडर्स काढणे , बिले काढणे तर सत्ताधारी हे आम्ही केले हे दाखविण्यात, जाहिरात करण्यात मशगुल आहेत पण सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे कोण पाहणार असे महाविकास आघाडीच्या वतीने विचारण्यात आले आहे. सदर तक्रारीचे निवेदन शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे अनंत घरत, युवक कांग्रेस चे सरचिटणीस सागर धाडवे, राष्ट्रवादी क्रीडा विभागाचे अध्यक्ष डॉ मदन कोठुळे यांनी दिले आहे. तसेच सोबत सानेगुरुजी नगर आंबील ओढा कॉलनी येथील अस्वच्छतेचे फोटो ही लावले आहे आणि निवेदनात तत्पर सदर विषयात प्रशासनाने लक्ष न घातल्यास आंदोलन करण्याचे ही कळविले आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?