मुंबई इंडियन्सचे ६ व्या विजयाचं स्वप्न अधुरंच? अंतिम सामन्यासाठी इतिहास बदलावा लागेल; आकडेवारी काय सांगते

0
1

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी पंजाब किंग्सने जयपूरला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा सामना दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना होता. पण दोन्ही संघांनी यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता या सामन्यानंतर कोणता संघ कोणता सामना खेळणार हे निश्चित झाले आहे.

या सामन्यात विजय मिळवल्याने पंजाब किंग्सचे १४ सामन्यांतील ९ विजय, ४ पराभव आणि १ रद्द सामन्यानंतर १९ गुण झाले आहेत. त्यांनी अव्वल क्रमांकावर स्थान मिळवले आहे. याशिवाय त्यांनी पाँइंट्स टेबलमधील पहिल्या दोनमधील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे ते २९ मे रोजी होणारा क्वालिफायर सामना खेळणार हे निश्चित आहे.

मात्र मुंबई इंडियन्सचा १४ सामन्यांतील ६ वा पराभव आहे, त्यांनी ८ सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे १६ गुण आहे. मुंबई इंडियन्सला यामुळे आता चौथ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागणार आहे. याचमुळे ते आता ३० मे रोजी होणारा एलिमिनेटर सामना खेळतील. दरम्यान, मुंबई इंडियन्सला पंजाबविरुद्ध विजय मिळवून पहिल्या दोन क्रमांकामध्ये स्थान पक्के करण्याची संधी होती. कारण तसे झाले असते तर त्यांनी गुजरात टायटन्सपेक्षा चांगल्या नेट रन रेटमुळे त्यांच्यावर स्थान मिळवले असते. मात्र आता मुंबईला एलिमिनेटर खेळावा लागला आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

मुंबई चौथ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांच्या चाहत्यांचीही धडधड वाढली असेल. कारण आत्तापर्यंत जेव्हाही मुंबई संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिलेत आणि एलिमिनेटर खेळलेत, त्यावेळी ते आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकले नाहीत.

मुंबई आयपीएलमध्ये यंदा ११ व्यांदा प्लेऑफमध्ये पोहचले आहेत. यापूर्वी १० प्लेऑफपैकी मुंबईने ६ वेळा पाँइंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते.

त्यांनी ६ वेळा क्वालिफायर १ सामना खेळला आहे. यातील ५ वेळा त्यांनी विजेतेपद मिळवले आहे. केवळ एकदाच त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. मात्र ज्यावेळी मुंबई इंडियन्स तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिलेत, त्यावेळी त्यांना अंतिम सामन्यापर्यंतच पोहचला आलेलं नाही.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

ही आकडेवारी पाहाता आता मुंबई चाहत्यांना हीच अपेक्षा असेल की हा इतिहास संघाकडून बदलला जावा. आता मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यापैकी एकाचा सामना एलिमिनेटरमध्ये करावा लागणार आहे. यापैकी कोणाचा सामना करणार हे २७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स संघात होणाऱ्या सामन्याच्या निकालानंतर निश्चित होईल.

आणखी एक चिंतेचे कारण मुंबईसाठी असे की यंदा प्लेऑफमध्ये पोहचलेल्या इतर तीन संघांविरुद्ध म्हणजेत गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिन्ही संघांविरुद्ध मुंबईला यंदाच्या हंगामात विजय मिळवता आलेला नाही.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

गुजरातने मुंबईला दोनदा पराभूत केले आहे, तर पंजाब आणि बंगळुरूने प्रत्येकी एकदा पराभूत केले आहे. त्यामुळे आता मुंबईला एलिमिनेटमध्ये मोठे आव्हान असून अंतिम सामन्यापर्यंत पोहचायचे असेल, तर इतिहास बदलावा लागणार आहे.

मुंबई इंडियन्सची आत्तापर्यंतची प्लेऑफमधील कामगिरी

२०१० – पहिला क्रमांक (उपविजेते)

२०११ – तिसरा क्रमांक (दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत)

२०१२ – तिसरा क्रमांक (एलिमिनेटरमध्ये पराभूत)

२०१३ – दुसरा क्रमांक (विजेते)

२०१४ – चौथा क्रमांक (एलिमिनेटरमध्ये पराभूत)

२०१५ – दुसरा क्रमांक (विजेते)

२०१७ – पहिला क्रमांक (विजेते)

२०१९ – पहिला क्रमांक (विजेते)

२०२० – पहिला क्रमांक (विजेते)

२०२३ – चौथा क्रमांक (क्वालिफायर २ मध्ये पराभूत)

२०२५ – चौथा क्रमांक (?)