निःस्वार्थी प्रेमाचे सर्वोच्च प्रतिक आईवडील – पद्मश्री डॉ तात्याराव लहाने

0
11

आदर्श आई-वडील पुरस्काराने मराठवाड्यातील रत्नांचे माता – पिता सन्मानित

पुणे / हडपसर : माणूस कर्तृत्वाने आणि वयाने कितीही मोठा झाला तरी तो आई वडिलांसमोर लेकरूच असते. प्राणी जीवनात निःस्वार्थी प्रेमाचे सर्वोच्च प्रतिक आईवडील असल्याने त्यांना वाईट वाटेल असे कोणतेही कृत्य मुलांनी आणि त्यांच्या बायकांनी करू नये. गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित संसाधनांमध्येही आपल्या मुलांचे शिक्षण, संस्कार, आणि समृद्ध व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांनी दिलेला त्याग व समर्पण स्तुत्य आहे. त्यांनी केवळ आपल्या मुलांना नव्हे, तर इतरांनाही योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. कोणी डॉक्टर, कोणी उद्योजक, कोणी अधिकारी, तर कोणी समाजसेवक बनून समाजाचे ऋण फेडत आहे असल्याचे मत पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मराठवाड मित्रपरिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान आयोजित मराठवाड्यातील रत्नांचा स्नेहमेळावा आणि आदर्श माता पिता पुरस्कार सोहळा उर्मिलाताई कराड सभागृह एमआयटी काॅलेज लोणीकाळभोर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रतिकुल परिस्थितीतून ज्यांनी कष्टाने आपल्या कुटुंबात सुसंस्कृत, जबाबदार आणि कर्तव्यदक्ष मुलांना घडविणाऱ्या मराठवाड्यातील रत्नांच्या माता-पित्यांना पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते आदर्श माता पिता पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, अल्युमिनियम मॅन भरत गिते, आयुक्त देविदास जाधव, कारागृह अधिक्षक राणी भोसले, पोलीस उप आयुक्त श्रीकांत डीसले, सहयोगी संपादक विलास बडे, स्नेहवन चे अशोक देशमाने, उद्योजक श्रीकांत शेळके, लक्ष्मण सावळकर, रमेश आगवणे, संजय माने, विकास भोसले संयोजक रवी पाटील, महेश टेळेपाटील आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

या कार्यक्रमात श्री व सौ अंजनाबाई शिवाजीराव जाधव, राजश्री हनुमंत शिकारे, मंदाकिनी औदुंबर डीसले, जमुनाबाई माणिकराव बढे, सत्यभामा बाबाराव देशमाने, शिलाबाई चंद्रकांत शेळके, सागरबाई अशोकराव सावळकर, सीताबाई जनार्दन आगवणे, वनमाला ज्योतीराम भोसले, मीना कर्ण पाटील, शोभा दत्तात्रय टेळेपाटील श्रीमती कुशावर्ता केशवराव गीते आणि श्रीमती मथुराबाई राम माने या दांपत्याला “आदर्श माता-पिता” म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या समर्पित पालकत्वामुळे त्यांच्या मुलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांचे कुटुंब हे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.

मराठवाडा मित्रपरिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यंदा पुरस्काराचे हे पाचवे वर्ष होते. कार्यक्रमासाठी राजेद्रं नारायणपुरे, दत्ता भाडवलकर , रणजीत गोदमगावे, चारुदत्त पाटील,दत्ताञय राठोडे, किशोर पाटील, मुरली पवार आदींनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी आई-वडिलांच्या भूमिकेचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले आणि असे पुरस्कार प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रा दिगंबर ढोकळे यांनी केले तर आभार रविराज पाटील यांनी मानले.